घरताज्या घडामोडीकोरोनाचा नवा BF.7 व्हेरियंट अतिधोकादायक; जाणून घ्या लक्षणं

कोरोनाचा नवा BF.7 व्हेरियंट अतिधोकादायक; जाणून घ्या लक्षणं

Subscribe

जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. जगभरातील सर्व अर्थचक्र पुन्हा एकदा रुळावर आले आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव ओसल्याने सर्वच निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाच आत कोरोनाच्या नव्या सब-व्हेरियंटने चिंता वाढवली आहे.

जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. जगभरातील सर्व अर्थचक्र पुन्हा एकदा रुळावर आले आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव ओसल्याने सर्वच निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाच आत कोरोनाच्या नव्या सब-व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटचा धोका कमी झाला आहे. मात्र, आता त्याच्या नवीन व्हेरिएंटने डोकं वर काढले आहे. (two new omicron subvariant bf 7 and ba 5 1 7 found in many countries)

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा नवा सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 यांमुळे पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. सद्यस्थितीत नियंत्रणात असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव हिवाळ्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन 2 नवीव सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 आढळून आले आहेत. हे व्हेरियंट चीनमध्ये आढळून आले आहेत. कोरोनाचे नवे सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचा धोका वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. चीनमध्ये आढळलेले हे नवीन व्हेरियंट बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेनमार्क आणि इंग्लंड मध्येही पसरताना दिसत आहे.

सध्या देशभरात गुलाबी थंडीची चाहूल लागताना कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील शाओगुआन शहरात B.5.1.7 आणि शाओगुआन आणि यांताई शहरांमध्ये BF.7 ची प्रकरणे आढळली आहेत. BF.7 हा प्रकार ओमिक्रॉन व्हेरियंटच्या BA.5 चा सबव्हेरियंट आहे. BA.5.1.7 आणि BF.7 उपप्रकार अत्यंत संसर्गजन्य आणि अधिक धोकादायक आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या BF.7 ची लक्षणे

  • घसा खवखवणे
  • डोकेदुखी
  • खोकला
  • नाक चोंदणे
  • सर्दी
  • शिंकणे
  • घोगरा आवाज
  • थकवा
  • अंगदुखी

हेही वाचा – चीनमध्ये पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फैलाव, लॉकडाऊन लागण्याची शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -