Homeदेश-विदेशTirupati Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी डीएसपीसह दोन अधिकाऱ्यांचे निलंबन; न्यायालयीन चौकशीचेही आदेश

Tirupati Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी डीएसपीसह दोन अधिकाऱ्यांचे निलंबन; न्यायालयीन चौकशीचेही आदेश

Subscribe

तिरुमला तिरुपती देवस्थानने भाविकांना श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी वाटप होणाऱ्या टोकन केंद्रावर झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरी प्रकरणी आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती दिली. तसेच या घटनेप्रकरणी एका डीएसपीसह दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानने भाविकांना श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आज, गुरुवारी (9 जानेवारी) पहाटेपासून भाविकांना टोकनचे वाटप करण्यात येणार होते. मात्र श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेता यावे यासाठी भाविकांनी बुधवारी (8 जानेवारी) सायंकाळपासूनच टोकन मिळणाऱ्या केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. यादरम्यान, केंद्रावर झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरी प्रकरणी आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती दिली. तसेच या घटनेप्रकरणी एका डीएसपीसह दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (Two officers including DSP suspended in Tirupati stampede case judicial inquiry ordered)

चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी आज चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच निष्काळजीपणाबद्दल एका डीएसपीसह दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

चंद्राबाबू नायडू म्हणाले की, मागील सरकारने तिरुपती येथे टोकन देण्याची एक नवीन प्रणाली सुरू केली होती, तर पूर्वी तिरुमला टेकड्यांवर टोकन देण्याची व्यवस्था होती. मात्र आता तिरुपतीमधील प्रशासन आणि देखरेख व्यवस्थेत काही त्रुटी आढळून आल्या आहेत, ज्या दुरुस्त करायला हव्या होत्या. पण त्या दुरुस्त न झाल्यामुळे ही घटना घडली आहे. असे म्हणत चंद्राबाबू नायडू यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

हेही वाचा – Delhi Election 2025 : जमत नसेल तर मोडून टाका इंडि आघाडी…आप-कॉंग्रेसमध्ये खटके, अब्दुल्ला भडकले

तत्पूर्वी, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एसव्हीआयएमएस (श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) ला भेट दिली आणि बुधवार झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांची विचारपूस केली. चंद्राबाबू नायडू यांनी भाविकांसह 90 मिनिटे संवाद साधला आणि एक एक करून सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.

टोकनसाठी भाविकांची गर्दी

दरम्यान, 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या वैकुंठ द्वार दर्शनासाठी देशभरातून शेकडो भाविक तिरुमला येथे आले आहेत. वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानने भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देवस्थानकडून आज पहाटे 5 वाजल्यापासून 10, 11 आणि 12 जानेवारीसाठी 1.20 लाख टोकनचे वाटप केले जाणार होते. यासाठी तिरुपतीमधील 8 केंद्रांवर 90 काउंटर उभारण्यात आले आहेत. मात्र टोकन नसलेल्या भाविकांना वैकुंठ द्वार दर्शनाच्या दिवसांमध्ये श्रीवरीचे दर्शन घेता येणार नाही, असे तिरुमला तिरुपती देवस्थानने आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे आपल्याला टोकन मिळावे यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच भाविकांनी टोकन मिळणाऱ्या केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. याचदरम्यान, विष्णू धामच्या काउंटरवर मारामारी झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. शहरातील एमजीएम शाळेजवळील बैरागी पट्टेडा येथे चेंगराचेंगरीची घटना घडली.

हेही वाचा – Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यात Appleच्या सहसंस्थापकाची पत्नी होणार सहभागी, दोन आठवडे करणार तपश्चर्या