घरदेश-विदेशपाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय जवानांनी दोन पाकिस्तानी सैनिकांना केले ठार

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय जवानांनी दोन पाकिस्तानी सैनिकांना केले ठार

Subscribe

पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने कुरापती सुरू आहेत. पाकिस्तानी सैन्य अधून मधून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आज पाकिस्तानात ७२ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असताना पाकिस्तानी सैन्याने मात्र पुन्हा एकदा भारतीय पोस्ट्वर हल्ला केला.

पाकिस्तानकडून सातत्याने सीमाभागात शस्त्रसंधीचे उल्लंघने केले जात आहे. आज त्यांचा ७२ वा स्वातंत्र्यदिन आहे, आजही हा प्रकार त्यांनी कायम ठेवला आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानी सैन्याने काश्मीरच्या तंगधार भागामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सातत्याने होणाऱ्या फायरींगला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात केलेल्या फायरींगमध्ये पाकचे दोन सैनिक ठार झाले. सर्जिकल स्ट्राईकनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

दहशतवादी करणार होते घुसखोरी

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सातत्याने सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी जोरदार गोळीबार केला जात होता. यामध्ये भारताच्या अनेक जवानांना वीरमरण पत्करावे लागले होते. प्रत्येक फायरींगनंतर भारतीय सैन्यानेदेखील प्रत्युत्तर दिले. काल झालेल्या फायरींगमध्ये दोन पाकिस्तानी सैनिक मारले गेले. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते. भारतीय जवानांनी याचा बदला घेतला असल्याचे म्हटले जात आहे. सोमवारी नियंत्रण रेषेजवळ पाकच्या सैन्याने दोन स्फोट घडवून आणले. यामध्ये भारताच्या दोन जवानांनी वीरमरण आले होते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मेजर कौस्तुभ राणेंसह तीन जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते.

- Advertisement -

इतरही ठिकाणी हल्ले

मंगळवारी सकाळीसुद्धा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताच्या चिताक पोस्ट आणि ब्लॅक रॉक पोस्ट या चौक्यावर पाकने गोळीबार केला. सकाळी सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर भारतानेदेखील प्रत्युत्तर दिले, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी केली.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -