घरताज्या घडामोडीपाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा, अमरनाथ यात्रेदरम्यान करणार होते हल्ला

पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा, अमरनाथ यात्रेदरम्यान करणार होते हल्ला

Subscribe

अमरनथा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. श्रीनगरमध्ये रविवारी दहशतवादी आणि पोलिसांची चकमक झाली.

जम्मू -काश्मीरमधील श्रीनगर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी श्रीनगरमधील बेमिना भागात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीमध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. बेमिना भागात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सर्च ऑपरेशन करत दहशतवाद्यांचा शोध घेतला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्यासाठी हे दहशतवादी पाकिस्तानातून आले असल्याची माहिती समोर आली आहे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमरनाथ यात्रा होणार आहे.

काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, जप्त केलेल्या कागदपत्रांनुसार, अब्दुल्ला घोरी, पाकिस्तानातील फैसलाबाद येथील रहिवासी असलेल्या एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव अनंतनाग जिल्ह्यातील आदिल हुसेन असे आहे. २०१८ मध्ये आदिल पाकिस्तानमध्ये गेला होता.

- Advertisement -

सोपोरमध्ये दहशतवाद्यांचा गट आहे. पाकिस्तानमधील हस्तकांनी अनंतनाग येथील रहिवासी दहशतवादी आदिल हुसैन मीरसह दोन पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पाठवले होते. हे सर्वजण २०१८ पासून पाकिस्तानात होते आणि अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. तिघेही ठार झाले आहेत. तसेच ७ जून रोजी पाकिस्तानच्या लाहोरमधील हंजाला येथे राहणारा एक दहशतवादी सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी मारला होता.

अमरनथा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. श्रीनगरमध्ये रविवारी दहशतवादी आणि पोलिसांची चकमक झाली. यामध्ये आदिल पर्रे मारला गेला. एका वर्षात सुरक्षा दलांनी तब्बल १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांमध्ये ७१ स्थानिक आणि २९ पाकिस्तानी दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे 63 दहशतवादी मारले गेले आहेत. जैश-ए-मोहम्मदचे उर्वरित २४ दहशतवादी अन्सार गज्वातुल हिंद आणि ISJK शी संबंधित होते.

- Advertisement -

हेही वाचा : राहुल गांधींनी ईडी चौकशीदरम्यान बदलली अनेक प्रश्नांची उत्तरं, आज पुन्हा चौकशीला राहणार हजर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -