एअर होस्टेससोबत गैरवर्तन करणाऱ्या दोघांवर कारवाई, स्पाइसजेटमधील घटना

गेल्या अनेक महिन्यांपासून विमानात विविध घटना घडत आहेत. एकीकडे विमानातील तांत्रित बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो तर, दुसरीकडे प्रवाशांचे विमानात गैरवर्तन करणे थांबत नाही. नुकताच स्पाइसजेटच्या विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन झाल्याची घटना घडली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून विमानात विविध घटना घडत आहेत. एकीकडे विमानातील तांत्रित बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो तर, दुसरीकडे प्रवाशांचे विमानात गैरवर्तन करणे थांबत नाही. नुकताच स्पाइसजेटच्या विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. (Two Passengers Debearded From A SpiceJet Flight Due To Misbehaved With The Cabin Crew)

स्पाइसजेटने दिलेल्या माहितीनुसार, स्पाईसजेटचे वेट-लीज्ड कॉरोंडेन फ्लाइट २३ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीहून हैदराबादकडे जाणार होते. त्यावेळी याच विमानातील केबिन क्रूशी प्रवाशांनी गैरवर्तन केल्याची घटना घडली. त्यानंतर स्पाइसजेटने तत्काळ कारवाई करत या प्रवाशांना विमानातून उतरले. तसेच, त्या दोघांना सुरक्षा पथकाकडे सोपवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत बोर्डिंगच्या दरम्यान एका प्रवाशाने बेजबाबदार आणि अयोग्य वर्तन केले अशी माहिती एका सुरक्षा कर्मचाऱ्याने दिली. या प्रवाशांनी केबिन क्रूला त्रास दिला. ही घटना घडल्यानंतर केबिन क्रूने तत्काळ या घटनेची माहिती पीआयसी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिली.

दरम्यान, याआधीही विमानात अशा घटना घडल्या आहेत. एअर इंडियाच्या विमानात एका महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याच्या घटनेने संपुर्ण देशभरात खळबळ माजली होती. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात मद्यधुंद तरुणांनी विमानातील महिला कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत गैरवर्तन केले आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांना अटक केली.

दिल्लीहून पाटण्यासाठी निघालेल्या इंडिगोच्या विमानात रोहित कुमार, नितीन कुमार आणि पिंटू कुमार प्रवास करत होते. यावेळी त्यांनी मद्यधुंद अवस्थेत विमानातच गोंधळ घातला. सुरुवातीला महिला कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. मात्र, मद्यधुंद तरुणांनी या महिला कर्मचाऱ्यांनाच अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे हे विमान पाटण्यात उतरल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी सीआयएसएफच्या पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली. यावेळी तिन्ही आरोपींनी विमानतळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांना अटक केली.


हेही वाचा – अँटिलिया प्रकरण : या षडयंत्रात सचिन वाझे एकटा नाही, एनआयएकडून सखोल तपास व्हावा – न्यायालय