घरताज्या घडामोडीनक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलीस शहीद, एक जखमी

नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलीस शहीद, एक जखमी

Subscribe

नक्षलवाद्यांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडली. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात दोन पोलीस शहिद झाले असून, एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते. राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

नक्षलवाद्यांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडली. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात दोन पोलीस शहिद झाले असून, एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते. राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावे आहेत. महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. (two policemen martyred and one injured due to naxalites attack on police at maharashtra chhattisgarh border)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याची घटना छत्तीसगड राज्याच्या हद्दीत घडली. विशेष म्हणजे ही हद्द महाराष्ट्र सीमेच्या चेकपोस्टपासून सुमारे 50 मीटर अंतरावर आहे. या हल्ल्यानंतर संबंधित परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

चहा पिण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर 10 ते 12 जणांच्या महिला-पुरुष नक्षलवाद्यांच्या टोळीने विनाशस्त्र हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

या घटनेनंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच, जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. दरम्यान, राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्यासाठी पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले होते. हे दोघेही बोरतलाव पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी आहेत.

- Advertisement -

दरम्यान, चहा पिण्यासाठी गेले असता त्या परिसरात असलेल्या नक्षलवाद्यांनी त्या पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर एक पोलीस कर्मचारी जखमी आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सदर घटना पोलिसांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन पोबारा केला.


हेही वाचा – काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वीच ‘या’ नेत्यांच्या घरांवर ईडीची छापेमारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -