धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून रेल्वे अधिकाऱ्यांनी तरुणीवर केला सामूहिक बलात्कार!

Two railway officers rape UP woman on premises of Bhopal station

एकाबाजूला देशात कोरोना व्हायरसचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. तर दुसऱ्याबाजूला कोरोनाच्या दरम्यान गुन्हाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरम्यान एका तरुणीने रेल्वे अधिकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. ही तरुणीनी उत्तर प्रदेशची असून रेल्वे अधिकारी मध्यप्रदेशची राजधानी भोपालचे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी उत्तर प्रदेशच्या २२ वर्षीय तरुणीवर भोपाल रेल्वे स्थानकात दोन रेल्वे अधिकाऱ्यांनी बलात्कार केला. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यासोबत फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर त्याने नोकर देण्याचे आमिष दाखवून तरुणीला भोपाल येथे बोलवले होते, असा पीडित तरुणीने आरोप केला आहे. पोलीस अधिकारी हितेश चौधरी यांनी पीटीआय सोबत बोलताना सांगितले की, ‘आम्ही ४५ वर्षीय मुख्य आरोपी राजेश तिवारीला अटक केली आहे. तो भोपाल रेल्वे विभागात आपत्ती व्यवस्थापन प्रभारी आणि सुरक्षा सल्लागार आहे.’

तरुणीने पोलिसांना सांगितले की, तिवारीने फेसबुकवर मैत्री करून नोकरी देण्याचे वचन दिले आणि तिला भोपालला बोलवून घेतले. जेव्हा ती भोपालला पोहोचली तर तिवारी भोपालच्या मुख्य स्टेशनमध्ये वेस्ट सेंट्रल रेल्वे कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील आपल्या खोलीत घेऊन गेला. त्यानंतर तिवारी आणि त्याच्या एका अन्य रेल्वे अधिकारी मित्राने तिला मादक पेय दिले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. मग दोन्ही अधिकाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती जीआरपीला पोहोचली. जीआरपीने दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तिवारीला अटक केली आहे.

पोलीस अधिकारी म्हणाले की, ‘आम्ही दुसऱ्या रेल्वे अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. परंतु अटक होण्यापूर्वीच तरुणीकडून ओळख पटण्याची आम्ही वाटत पाहत आहोत.’


हेही वाचा – पत्नीला मारहाण करणाऱ्या डीजीचे निलंबन; Viral व्हायरल होताच केली कारवाई