घरदेश-विदेशबारामुल्ला येथे चकमकीत दोन दहशतवादीही ठार, शोपियानमध्ये शोध मोहीम सुरू

बारामुल्ला येथे चकमकीत दोन दहशतवादीही ठार, शोपियानमध्ये शोध मोहीम सुरू

Subscribe

श्रीनगर – उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील येडीपोरा पट्टणमध्ये सुरक्षा दलांनी सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. येथील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या दोन झाली आहे. गोळीबार अजूनही सुरू आहे. अजूनही दहशतवादी असल्याचे सांगीतले जात आहे. ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसून ठार झालेले दोन्ही दहशतवादी स्थानिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गोळीबारात दोन दहशतवादी ठार –

- Advertisement -

बारामुल्ला येथील येडीपोरा पट्टण येथे सुरू असलेल्या चकमकीत दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची अनेक संधी देण्यात आली होती. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू ठेवला त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एकामागून एक दोन दहशतवादी ठार झाले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी बारामुल्लामध्ये रात्री शोध मोहीम सुरू केली होती. याठिकाणी तीन ते चार दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची भीती व्यक्त केली जात होती. चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आता एकच दहशतवादी येथे उरला आहे.

- Advertisement -

शोध मोहीम सुरू –

शोपियानच्या चित्रगाम भागात दुपारी २ वाजताच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेली चकमक आता संपली आहे. येथील रहिवासी भागात लपलेले दहशतवादी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, तरीही सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.

पोलिसांनी सांगितले की आज पहाटे मिळालेल्या माहितीच्या आधारे, एसओजी, आर्मी आणि सीआरपीएफच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी शोपियान जिल्ह्यातील चित्रगाम आणि बारामुल्ला येथील येडीपोरा पट्टण येथे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा जवान तळांजवळ पोहोचताच तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पोलिस सूत्रांनी सांगितले की, शोपियानमध्ये दुपारी दोनच्या सुमारास चकमक सुरू झाली. रात्रभर दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू होता, पण सूर्य उगवला तोपर्यंत दहशतवाद्यांचा गोळीबार थांबला. सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली असता, अंधाराचा फायदा घेत दहशतवादी चकमकीच्या ठिकाणाहून पळून गेल्याचे आढळून आले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, निवासी भागात लपलेले दोन ते तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते, परंतु त्यांनी परिसराला वेढा घालून दहशतवाद्यांचा शोध सुरू ठेवला आहे. या भागात अजूनही दहशतवादी असल्याचा त्यांना संशय असून सध्या शोधमोहीम सुरू आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -