Jammu kashmir : अवंतीपोरामध्ये चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान ; AK-47 जप्त

जम्मू-काश्मीरमधील (Jammu kashmir) अवंतीपोरा येथे आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली असून लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठन्सान घालण्यात यश मिळालं आहे. तसेच त्यांच्याकडून दोन AK-47 या रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. शाहीर राथेर आणि उमर युसूफ अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. चकमकीची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

शाहिदचा अरिपाल येथील शकीला नावाच्या महिलेच्या आणि लुर्गम त्राल येथील सरकारी कर्मचारी जाविद अहमद यांच्या हत्येत सहभाग होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितले. भारतीय सुरक्षा दल शोध मोहीम राबवत असताना लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. चकमक संपल्यानंतर सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबवली जात आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी अवंतीपोरा येथील राजपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्रालचा रहिवासी शाहिद राथेर आणि शोपियानचा रहिवासी उमर युसूफ अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असून त्यांची ओळख पटली आहे.

हेही वाचा  : Jammu Kashmir: स्फोटकांनी भरलेला ड्रोन उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा रक्षकांना मोठं यश

सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणाहून दोन एके रायफल आणि गुन्ह्यात वापरलेली इतर सामग्री जप्त केली आहे. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी रविवारी रात्री सांगितले होते की, जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ज्यामध्ये हवालदार रियाझ अहमदचा खून सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत झाला होता.

पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले होते. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, रविवारी रात्री पुलवामाच्या गुंडीपूरमध्ये सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर चकमकीसा सुरूवात झाली.


हेही वाचा : Elon Musk : सर्वात जास्त पगार घेणाऱ्यांमध्ये एलॉन मस्क पहिल्या स्थानावर, तर नाडेला सातव्या क्रमांकावर; मस्क यांची संपत्ती किती?