Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोनाबाधित गंभीर रुग्णांचे प्राण वाचवू शकतात 'हे' दोन स्टिरॉइड - WHO

कोरोनाबाधित गंभीर रुग्णांचे प्राण वाचवू शकतात ‘हे’ दोन स्टिरॉइड – WHO

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार जितक्या वेगाने वाढत आहेत तितक्याचे वेगाने सध्या कोरोना रोखण्यासाठी औषधे शोधली जात आहेत. आता या महामारीत स्टिरॉइड देखील लोकांचे जीव वाचवण्याचे काम करू शकेल, असे एका नव्या अहवालानुसार समोर आले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटना म्हणते की, कोरोनाच्या गंभीर रुग्णांना स्टिरॉइड दिले जाऊ शकतात. जून महिन्यात ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने बऱ्याच हॉस्पिटलमध्ये रिकव्हरी ट्रायल घेतली होती. या ट्रायलमध्ये कोरोनाबाधित प्रत्येक ८ गंभीर व्यक्तींपैकी एका व्यक्तीचे प्राण डेक्सामेथासोन नावाच्या स्टिरॉइडने वाचविण्यात आल्याचे आढळले.

या ट्रायल व्यतिरिक्त इतर सहा ट्रायलमध्ये असे समोर आले की, हायड्रोकार्टिसोन नावाच्या आणखी एका स्टिरॉइडही रुग्णांचे प्राण वाचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हायड्रोकार्टिसोन स्वस्त तसेच सहज उपलब्ध देखील होत आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये सात ट्रायलचे अहवाल प्रकाशित झाले आहेत. यामध्ये म्हटले आहे की, ‘ही दोन औषधे गंभीर आजार असलेल्या लोकांमध्ये मृत्यूची शक्यता २० टक्क्यांपर्यंत कमी करतात.’

- Advertisement -

इंग्लंडमधील ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे महामारी विज्ञानाचे प्रोफेसर जोनाथन स्टर्न म्हणाले की, ‘स्टिरॉइड एका स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे औषध आहे. आमच्या विश्लेषणात असे म्हटले आहे की, ही औषधे कोरोनाचे गंभीर रुग्णांना मृत्यू पासून वाचवतात. ही औषधे सर्व वयोगटातील आणि सर्व वर्गाच्या लोकांवर काम करतात.’

ब्राझील, फ्रान्ससह अनेक देशांमधील लोकांवर रिकव्हरी ट्रायल करण्यात आली आहे. प्रोफेसर जोनाथन स्टर्न म्हणाले, ‘या सर्व ट्रायलच्या अहवालावरून असे दिसून येते की, हायड्रोकार्टिसोन, डेक्सामेथासोन स्टिरॉइड प्रमाणेचे रुग्णांवर प्रभावी आहे.’ दरम्यान ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि रिकव्हरी ट्रायलचे उपमुख्य अन्वेषक मार्टिन लँड्रे यांचे म्हणणे आहे की, ‘जेव्हा रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होता तेव्हा व्हेंटिलेटरची वाट न पाहता स्टिरॉइड दिले जाऊ शकतात.’

- Advertisement -

या औषधांचा पहिल्यांपासून मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मे महिन्यांत जवळपास ७ ते ८ टक्के रुग्णांना डेक्सामेथासोन देण्यात आले होते. त्यानंतर जून अखेरस याचे प्रमाण ५५ टक्क्यांपर्यंत वाढले. इंपीरियल कॉलेज लंडनचे प्रोफेसर अँथोनी गॉर्डना यांच्या नेतृत्वाखाली हायड्रोकोर्टिसोनचे ट्रायल केले होते. हे ट्रायल ८८ हॉस्पिटलमधल्या रुग्णांवर करण्यात आले होते. एनएचएस आणि जगभरातील इतर हॉस्पिटलमध्ये आता कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर डेक्सामेथासोन आणि हायड्रोकार्टिसोनचा अवलंब जास्त केला जात आहे.


हेही वाचा – Corona Vaccine खरेदीसह वितरणासाठी तब्बल ७६ देश आले एकत्र!


 

- Advertisment -