घरदेश-विदेश६ वर्षानंतर 'त्या दोघींनी' केलं लग्न

६ वर्षानंतर ‘त्या दोघींनी’ केलं लग्न

Subscribe

कलम ३७७चा आधार घेत त्या दोघींनी अखेर सहा वर्षानंतर लग्न केलं आहे.

सहा वर्षापूर्वी त्या दोघी कॉलेजला असताना एकमेकांच्या प्रेमात पडल्या. त्या दोघींना लग्न देखील करायचं होतं. पण, समाज काय म्हणेल? शिवाय, घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांनी स्वत:च्या मर्जीविरोधात जात लग्न देखील केलं. पण, त्या दोघींना त्यांचं प्रेम काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हतं. सहा वर्षानंतर त्यांनी अखेर घटस्फोट घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. उत्तरप्रदेशातील बुंदेलखंडमधील मंदिरामध्ये अखेर या दोघींनी लग्न केलं. या दोघींही २६ आणि २४ वर्षाच्या आहेत. पण, त्यांच्या लग्नाची नोंद करून घेण्यास रजिस्टारनं नकार दिला. भारतीय दंड विधान कायद्यातील कलम ३७७ नुसार समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही. त्याचा आधार घेत अखेर या दोघींनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला.

वाचा – कलम ३७७ रद्द – वाचा काय म्हणाले बॉलिवूड कलाकार!

काय आहे प्रकरण

उत्तरप्रदेशातील बुंदेलखंड येथील दोन मैत्रिणी एकमेकांच्या प्रेमात पडल्या. पण, घरच्यांना ज्यावेळी ही सारी गोष्ट कळली तेव्हा त्यांनी दोघींचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. पण, सहा वर्षानंतर दोघींनी देखील घटस्फोट घेत भादंवि कलम ३७७च्या आधारे लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नानंतर रजिस्टार आर. के. पाल यांनी लग्नाची नोंदणी करण्यास नकार दिला.

- Advertisement -

१९९५ ते २००३ या काळात केरळामध्ये २२ समलैंगिकांनी आत्महत्या केली आहे.

वाचा – Section377: ओडिशाची पहिली ट्रांसजेंडर अधिकारी लग्नासाठी तयार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -