Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Corona Vaccination: २ वर्षांच्या मुलांना लस देणारा 'हा' ठरला जगातील पहिला देश!

Corona Vaccination: २ वर्षांच्या मुलांना लस देणारा ‘हा’ ठरला जगातील पहिला देश!

Related Story

- Advertisement -

गेल्या दीड वर्षांपासून जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून अद्याप तो सुरूच आहे. अशातच कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात रहावा म्हणून कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लहान मुलांना अजून कोरोनाची लस देशात दिली जात नसल्याचे दिसतेय. मात्र कोरोना संकटादरम्यान लसीकरणाच्या बाबतीत क्यूबा या देशाने एक नवं पाऊल उचलल्याचे दिसून आले आहे. या नव्या कामगिरीनुसार, अवघ्या २ वर्षांच्या मुलांना देखील कोरोना लस देण्यास सुरुवात करणारा क्युबा हा जगातील पहिला देश ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्यूबा या देशात दोन कोरोना लस दिल्या जात आहेत, ज्या क्युबामध्येच विकसित करण्यात आल्या आहेत, त्या लसींना सध्या जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता देण्यात आलेली नाही.

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, क्यूबामध्ये अब्दला आणि सोबराना नावाच्या कोरोना लस दिल्या जात आहेत. मुलांवर त्यांची क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी क्युबामधील मुलांना कोरोनाची लस देण्यास सुरूवात झाली. सर्वप्रथम १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोनाची लस देण्यात आली, त्यानंतर सोमवारपासून २ ते ११ वर्षांच्या मुलांनाही कोरोना लस देण्यास सुरूवात करण्यात आली. विशेष म्हणजे सध्या क्युबाच्या सिएनफुएगोस शहरातील या वयोगटातील मुलाना ही लस देण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान जगातील अनेक देशांमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे कोरोना लसीकरण आधीच सुरू करण्यात आले आहे. तर काही देशांमध्ये कोरोना लसीच्या चाचण्या अद्याप सुरू आहेत. चीन, यूएई, व्हेनेझुएला यांनीही लहान मुलांना कोरोनाची लस देण्याची घोषणा केली आहे, परंतु सर्वात प्रथम क्युबाने त्यांच्या देशातील लहान मुलांना कोरोना लस देण्यास सुरूवात केली. भारतातही कोरोना लस १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना देण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी झायडस कॅडिलाची कोरोना लस भारतात आपतकालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली. ही लस १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाऊ शकते. झायडस कॅडिलाच्या कोरोना लसीला ZyCoV-D असे नाव देण्यात आले आहे, ही DNS वर आधारित जगातील पहिली स्वदेशी लस असून ज्या लसीला DCGI ने मान्यता दिली आहे.


तिसऱ्या लाटेचा फटका कोणत्या राज्यांना बसू शकतो ? ICMR चे स्पष्टीकरण

 

- Advertisement -