बंगळुरू : जशी जमिनीवरील वाहतूक व्यवस्था अगणित आहे अगदी तशीच वाहतूक हवेतूनही होते. मात्र, उंच आकाशातून प्रवास करताना कुण्या प्रवाश्यासोबत काय होईल काही सांगता येत नाही. असाच एक प्रकार बंगळुरू ते दिल्लीला जाणाऱ्या एका विमानात घडला असून, विमानात असलेल्या दोन वर्षीय चिमुकलाचा अचानक श्वास थांबला आणि नंतर जे घडले ते अनेकांच्या ऱ्हदयाचा ठोका चुकविणारे असेच होते. नेमके काय घडले होते त्या विमानात ते वाचा या वृत्तातून.(Two-year-old boy’s breathing stopped in Karnataka-Delhi flight; ‘Those’ five became angels)
झाले असे की, कर्नाटकच्या बंगळुरू विमानतळावरून राजधानी दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या एका विमानात एक दोन वर्षाची चिमुकली तिच्या कुटुंबियांसोबत प्रवास करीत होती. या प्रवासा दरम्यान तिचा श्वास थांबला. यावेळी मात्र, त्याच विमानात असलेल्या पाच डॉक्टरांनी तिच्यावर तब्बल 45 मिनीटं उपचार करून तिचे प्राण वाचवले. हा सगळा प्रकार काल 27 ऑगस्ट रोजी घडला. या घटनेनंतर दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून माहिती दिली आहे.
#Always available #AIIMSParivar
While returning from ISVIR- on board Bangalore to Delhi flight today evening, in Vistara Airline flight UK-814- A distress call was announcedIt was a 2 year old cyanotic female child who was operated outside for intracardiac repair , was… pic.twitter.com/crDwb1MsFM
— AIIMS, New Delhi (@aiims_newdelhi) August 27, 2023
विमानात झाला होता गोंधळ
27 ऑगस्ट रोजी बंगळुरूहून दिल्लीकडे जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सचे युके-814 या विमानात अचानक एक दोन वर्षीय चिमुकलीची तबेत खराब झाली होती. ती सियानोटिक या आजाराने ग्रस्त होती. तिचे इंट्राकार्डियलसाठी शस्त्रक्रिया झाली होती. या प्रवासादरम्यान त्या चिमुकलीची तबेत एवढी खराब झाली होती की, ती बेशुद्ध झाली होती. त्या मुलीची अशी अवस्था बघून विमानात असलेले प्रवासी घाबरून गेले होती. दरम्यान त्याच विमाना दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे पाच डॉक्टर प्रवास करत होते. यावेळी त्यांनी त्या चिमुकलीला योग्य ते उपचार देण्यास सुरुवात करून तिचे प्राण वाचवले.
हेही वाचा : दुखापत गंभीर स्वरुपाची नसली तरी, हत्येच्या प्रयत्नाचा आरोपी दोषीच – सुप्रीम कोर्ट
45 मिनिंट केले शर्थीचे प्रयत्न
त्या चिमुकलीवर उपचार करताना विमानातील एम्स रुग्णालयाचे डॉक्टरांच्या अडचणी तेंव्हा वाढल्या जेंव्हा त्या मुलीला कार्डिएक अरेस्ट पडला. यावेळी हजर असलेल्या डॉक्टरांनी AED नावाचा औषधोपचार वापरले होते. यावेळी डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे मुलीवर उपचार केले. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या सर्व साधनांचा वापर करून मुलीचे प्राण वाचले. 45 मिनिटे उपचार केल्यानंतर विमान नागपूरला नेण्यात आले आणि येथील बालरोग तज्ज्ञांकडे सोपवण्यात आले. मुलीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
हेही वाचा : कोटात पाच तासांमध्ये दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या; पेपर देताच लातूरच्या विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य
या पाच डॉक्टरांनी वाचवले चिमुकलीचे प्राण
एम्सच्या पाच डॉक्टरांनी मुलीला वाचवले त्यामध्ये डॉ. नवदीप कौर, डॉ. दमनदीप सिंग, डॉ. ऋषभ जैन, डॉ. ओशिका आणि डॉ. अवचला टॅक्सक यांचा समावेश होता.