Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पुलवामा हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण, देशभरात शहिदांना वाहिली श्रद्धांजली

पुलवामा हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण, देशभरात शहिदांना वाहिली श्रद्धांजली

दिल्लीच्या इन्टिग्रेनेट डिफेन्स स्टाफ मुख्यालयात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याचा यावेळी निषेधही करण्यात आला.

Related Story

- Advertisement -

आज १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. मात्र दोन वर्षांपूर्वी हाच दिवस संपूर्ण देशासाठी आणि भारताच्या जवानांसाठी एक काळा दिवस ठरला. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या पुलवामा हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात CRPF चे ४० जवान शहिद झाले होते. आज देशभरात या शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शहिद झालेल्या ४० शहिदांमध्ये CRPF च्या ७६ व्या बटालियनच्या ५ जवानांचा समावेश होता. दिल्लीच्या इन्टिग्रेनेट डिफेन्स स्टॉफ मुख्यालयात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याचा यावेळी निषेधही करण्यात आला. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर हल्ला केला. त्यावेळी ४० जवान यात शहिद झाले. या भ्याड हल्ल्यात जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

- Advertisement -

हल्ला करणारे आदिल, कारी यासीर, सज्जाद भट्ट, उमर फारुक, मुद्सीर अहमद खान हल्ला करणाऱ्या सर्वांना मारण्यात आले. NIA यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऑगस्ट २०२० मध्ये पुलवामा हल्ल्या एनआयएने ऑगस्ट 2020 मध्ये पुलवामा हल्ल्याबद्दल १३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण १९ जाणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता. हे ६ दहशतवादी वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये मारले गेले होते.

NIA च्या चार्टशीटमध्ये सांगितले गेले आहे की, जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटनेने ISI या पाकिस्तानी सरकारी ऐजंसीसोबत मिळून पुलवामा हल्ल्याचा प्लॉन तयार केला होता. यात १३ जिवंत आरोपींची नावेही होती. ज्यात जैश सरगना मौलाना मसूद अजहर आणि त्याचे भाऊ यांची नावे होती. या भ्याड हल्ल्यानंतर १२ दिवसात भारताने पाकिस्तानचा बदल घेतला. पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैशच्या छावणीवर हल्ला केला. १५ फेब्रुवारीला CCS ची बैठक पार पडली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा बदल घेण्याचे ऑप्शन्स देण्यात आले.

- Advertisement -

उरी हल्ल्यानंतर भरताने सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या चर्चेनंतर भारताने एअर स्ट्राइक करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींनी NSA चे अजित डोभाल यांच्यावर याची जबाबदारी देण्यात आली होती. बालाकोटच्या जैश ए मोहम्मद छावणीवर भारतीय लष्कराने हल्ला केला.


हेही वाचा – राहुल प्रलयाची गोष्ट करणारी व्यक्ती; अर्थमंत्र्यांविरुद्ध विशेषाधिकार भंगाची नोटीस

- Advertisement -