घरताज्या घडामोडीअमेरिकेचा WHOसोबत काडीमोड, जमा केली कागदपत्र

अमेरिकेचा WHOसोबत काडीमोड, जमा केली कागदपत्र

Subscribe

जगातील कोरोना विषाणूच्या संकटादरम्यान अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत अमेरिकेने संयुक्त राष्ट्राला अधिकृतरित्या कळवले आहे. जागतिक आरोग्य संघटना ही संयुक्त राष्ट्राच्या आरोग्याशी संबंधित सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेला अमेरिका सर्वाधिक वार्षिक मदत करत आहे. कोरोनाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेल्या भूमिकेविषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या काळात जागतिक आरोग्य संघटना चीनला पाठिंबा देत असल्याचे आरोप देखील केला होता. तसेच अमेरिकेने जागातिक आरोग्य संघटनेचा आर्थिक निधी रोखू आणि संघटनेतून बाहेर पडून असा देखील इशारा दिला होता. अखेर मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसकडे कागदपत्रे दिली आहेत.

नियमांनुसार जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्यासाठी १ वर्षा अगोदर माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे ६ जुलै २०२१ पर्यंत अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडू शकत नाही. याचाच अर्थ असा की एका वर्षामध्ये या निर्णयात बदल देखील होऊ शकतो. सिनेटर बॉब मेनेन्देझ यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याची माहिती यूएस काँग्रेसला दिली आहे.

- Advertisement -

मे महिन्यात अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. एप्रिल महिन्यात संघटनेचा आर्थिक निधीवर रोखला जाईल असे देखील सांगितले होते. शिवाय यानंतर संघटनेत सुधारणा करण्यासाठी पत्र देखील अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला लिहिले होते. कोरोनाच्या काळात सुरुवातीलाच अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटनेमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता अखेर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.


हेही वाचा – Corona: अमेरिका लस निर्मितीसाठी ‘या’ कंपनीला देणार १२ हजार कोटी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -