घरदेश-विदेशनोकरी-धंदा, शिक्षणासाठी युएईला जायचंय? मग हे वाचाच !

नोकरी-धंदा, शिक्षणासाठी युएईला जायचंय? मग हे वाचाच !

Subscribe

अबुधाबी – संयुक्त अरब अमिरातने व्हिसा धोरणात बदल केला आहे. याचा फायदा हा गुंतवणूकदार, विद्यार्थी, डॉक्टर आणि विशेषज्ञांना होणार आहे. नव्या धोरणानुसार गुंतवणूकदारांना 10 वर्षांचा वास्तव्य व्हिसा मिळणार आहे. युएई कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये या नव्या धोरणाला मान्यता देण्यात आली. शेख मोहम्मद बिन अल् मकतूम यांच्या उपस्थितीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळालाय. ट्विटरवरून या निर्णयाची घोषणा करण्यात आली. शिवाय उद्योगपतींच्या कुटुंबांचा देखील यावेळी विचार करण्यात आलाय. मेडिकल, विशेषज्ञ आणि तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे.

निर्णयाचा काय होणार फायदा? 

- Advertisement -

संयुक्त अरब अमिरात सरकारच्या या निर्णयामुळे दर सहा महिने ते दोन वर्षांनी व्हिसा नुतनीकरणासाठी होणारी धावपळ थांबणार आहे. शिवाय परदेशी जाऊन रोजगार शोधणाऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. भारतातील लोक मोठ्या प्रमाणावर परदेशात नोकरीसाठी जातात. युएई सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. गुंतवणूकदारांना देखील व्हिसा नुतनीकरणासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीपासून सुटका मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही उद्योजक, विद्यार्थी , मेडिकल क्षेत्राशी निगडीत असाल, तर तुम्हाला युएईच्या व्हिसा धोरणापासून काही काळ दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

युएईच्या अर्थव्यवस्थेला फायदा

संयुक्त अरब अमिरातने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा हा देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील होणार आहे. या निर्णयामुळे देशात गुंतवणुकीचा ओघ वाढेल आणि त्याचा फायदा हा अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासाठी होणार आहे. गुंतवणूक योग्य वातावरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान या साऱ्या गोष्टींचा फायदा हा युएईला होईल, असा विश्वास यावेळी शेख मोहम्मद यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -