Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी UAE ५ ऑगस्टपासून भारतीयांसाठी उघडणार दरवाजे

UAE ५ ऑगस्टपासून भारतीयांसाठी उघडणार दरवाजे

Related Story

- Advertisement -

संयुक्त अरब अमिरात (UAE) भारतसह सहा देशांतील लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ५ ऑगस्टपासून प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. याबाबत मंगळवारी युएईच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. संयुक्त अरब अमिरातचे नॅशनल इमरजेंसी क्रायसेस अँड डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (NCEMA) आणि सामान्य नागरिक उड्ड्यान प्राधिकरणाकडून जारी केलेल्या निर्देशानुसार, पाकिस्तान, श्रीलंका, नायजेरिया आणि युगांडाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना युएईमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. या देशातील प्रवाशांकडे लसीकरण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

नव्या निर्देशानुसार, तसेच इतर श्रेणीमधील दोन लस घेतलेल्यांना आणि लस न घेतलेल्या प्रवाशांना ५ ऑगस्टपासून युएईचे दरवाजे उघडणार आहेत. या श्रेणीमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये कार्यरत डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी, शिक्षण क्षेत्रात काम करणारे, विद्यार्थी, स्थानिक सरकारी संस्थांचे कर्मचारी आदी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

- Advertisement -

भारत संयुक्त अरब अमिरातीसह गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल (जीसीसी) राज्यांवर दबाव टाकत होता की, कोविड -१-संबंधित प्रवास निर्बंध शिथिल करून भारतीय व्यावसायिक आणि इतर कामगारांना त्यांच्या नोकरीत परतण्याची परवानगी द्यावी. अलीकडील काही अहवालात म्हटले आहे की, यूएई ऑगस्टपर्यंत निर्बंध वाढवू शकते.

माहितीनुसार संयुक्त अरब अमिरामध्ये ३० लाखांहून अधिक भारतीय राहतात. पश्चिम अशियामधील प्रवाशांसाठी सर्वात मोठी संख्या आहे. युएईमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे डॉक्टर आणि नर्स आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला युएईने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतावर नवीन प्रवास निर्बंध लावले आणि उड्डाणे निलंबित केली होती.


- Advertisement -

हेही वाचा – Covid-19 India: कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाहीच; १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने वाढतोय


 

- Advertisement -