घरताज्या घडामोडीआता दिवसभर फिरा Uber मधून तेही फक्त प्रतितास १४९ रूपयांत

आता दिवसभर फिरा Uber मधून तेही फक्त प्रतितास १४९ रूपयांत

Subscribe

Uber ने भारतात नवीन ऑटो रेंटल सर्व्हिसची सुरूवात केली आहे. या सेवेद्वारे कंपनी आता कॅबसोबतच ऑटो रिक्षाही रेंटवर उपलब्ध करणार आहे. याचाच अर्थ तुम्ही आता उबरच्या माध्यमातून रिक्षाही बूक करू शकणार आहात. या नव्या सेवेसाठी कंपनी कंपनीकडून प्रतितास १४९ रूपये आकारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या पॅकेजमध्ये फ्री किलोमीटरचाही समावेश आहे. ही सेवा पुण्यात सुरू झाली आहे. पुण्याबरोबर मुंबई, बंगळुरू,हैद्राबाद, चेन्नई आणि दिल्ली- एनसीअर अशा भारतातील इतर शहरांमध्येही ही सेवा उपलब्ध होणार आहे.

प्रवाशांना ऑटो बदलावी लागणार नाही

या सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशनवर जाण्यासाठी वारंवार कॅब/ ऑटो बदलावी लागणार नाही. जर तुम्ही एका तासासाठी रिक्षा बूक केली असेल तर यासाठी तुम्हाला केवळ १४९ रूपये द्यावे लागतील आणि या कालावधीत तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणचा प्रवास करू शकतात. ग्राहक जास्तीतजास्त ८ तासांसाठी रिक्षा बूक करू शकता.

- Advertisement -

App अपडेट करावं लागणार

या सेवेमुळे ऑटो रेंटल सेवा २४ तास उपलब्ध असणार आहे. UBER देशातील पहिली राइड शेअरिंग कंपनी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. याद्वारे ग्राहक आपल्या गरजेनुसार ठराविक तासांसाठी रिक्षाचं बुकिंग करु शकतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या फोनमधील कंपनीचं App अपडेट करावं लागेल.


हे ही वाचा – ‘या’ कपल्सची सेक्स लाईफ असते हेल्दी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -