घरदेश-विदेश"UCC म्हणजे हिंदू कोड बिल"; समान नागरी संहिता विधेयकावर ओवैसींचा आक्षेप

“UCC म्हणजे हिंदू कोड बिल”; समान नागरी संहिता विधेयकावर ओवैसींचा आक्षेप

Subscribe

उत्तराखंड सरकारने मंगळवारी विधानसभेत समान नागरी संहिता (UCC) विधेयक सादर केले. अनेक मुस्लीम संघटना या विधेयकाच्या विरोधात आहेत आणि आता एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही यूसीसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली: उत्तराखंड सरकारने मंगळवारी विधानसभेत समान नागरी संहिता (UCC) विधेयक सादर केले. अनेक मुस्लीम संघटना या विधेयकाच्या विरोधात आहेत आणि आता एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही यूसीसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी या विधेयकातील त्रुटी दाखवून दिल्या. मला माझा धर्म आणि संस्कृतीचं पालन करण्याचा अधिकार आहे, असं ओवैसी म्हणाले, हे बिल मला दुसऱ्या धर्माचे नियम पाळण्यासाठी भाग पाडत आहे. (UCC stands for Hindu Code Bill Asaduddin Owaisi s objection to the Uniform Civil Code Bill)

असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करून समान नागरी संहिता विधेयकाला विरोध केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हिंदू अविभक्त कुटुंबाला यात स्पर्श सुद्धा करण्यात आलेला नाही.” असे का? जर तुम्हाला उत्तराधिकारी आणि वारसा हक्कासाठी समान कायदे हवे असतील, तर हिंदूंना त्यापासून का दूर ठेवले जाते? कायदा तुमच्या बहुतांश राज्यांना लागू होत नसेल तर तो एकसमान मानला जाऊ शकतो का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

ओवैसी यांनी लिहिले की, “बहुपत्नीत्व, हलाल, लिव्ह इन रिलेशनशिप हे चर्चेचे विषय आहेत पण हिंदू अविभाजित कुटुंबांचा यात समावेश नाही. हे असं का केलं, असा प्रश्न कोणीही विचारत नाही.
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या राज्याचे पुरामुळे 1000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 17000 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून त्यामुळे राज्याचे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. उत्तराखंडची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि त्यामुळेच सरकारला या विधेयकाची गरज आहे, असं उत्तराखंडच्या धामी सरकारने म्हटलं आहे.

हे अनुच्छेद 25 आणि 29 चं उल्लंघन

ओवैसींनी पोस्टमध्ये लिहिले, “यूसीसीमध्ये इतर घटनात्मक आणि कायदेशीर समस्या देखील आहेत. मला माझा धर्म आणि संस्कृती पाळण्याचे स्वातंत्र्य आहे पण हे विधेयक मला वेगळ्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्यास भाग पाडत आहे. आमच्या धर्मात, वारसा आणि विवाह हा धार्मिक प्रथेचा भाग आहे, परंतु आम्हाला वेगळ्या पद्धतीचे पालन करण्यास भाग पाडणे हे कलम 25 आणि 29 चे उल्लंघन आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Narendra Modi : सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने उघडपणे लोकशाहीचा गळा घोटला; मोदींचा आरोप)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -