घरताज्या घडामोडीउदयपूर हत्याकांड! मुस्लिम भारतात तालिबानी मानसिकता रुजवणार नाहीत, अजमेर दर्ग्याच्या दिवाणांना विश्वास

उदयपूर हत्याकांड! मुस्लिम भारतात तालिबानी मानसिकता रुजवणार नाहीत, अजमेर दर्ग्याच्या दिवाणांना विश्वास

Subscribe

या प्रकरणी आता अजमेर दरगाहच्या दीवान जैनुल आबेदीन अली खान प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिम समाजाकडून भारतात कधीच तालिबानी मानसिकता आणली जाणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही उमटताना दिसत आहेत. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ उदयपूर येथील एका टेलरने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणी आता अजमेर दरगाहच्या दीवाण जैनुल आबेदीन अली खान प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिम समाजाकडून भारतात कधीच तालिबानी मानसिकता आणली जाणार नाही, असं ते म्हणाले आहेत. (Udaipur killing! Muslim society will never inculcate Taliban mentality in India)

हेही वाचा – नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्या टेलरची तलवारीने गळा चिरून हत्या, व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

दहा दिवसांपूर्वी कन्हैयालाल याने सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ  एक पोस्ट शेअर केली होती. हल्लेखोरांनी त्याच रागातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. कन्हैयालाल याच्यावर हल्ला करतानाचा व्हिडीओ हल्लेखोरांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात कन्हैयालाल या दोघांना आपल्याला सोडून द्या अशी विनवणी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे कन्हैयालालच्या हत्येची जबाबदारी घेत असल्याचे दोघे ह्ल्लेखोर सांगत असून पंतप्रधान मोदींनाही जीवे मारणार असल्याची धमकी या दोघांनी व्हिडीओमध्ये दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेत गर्भपाताचे घटनात्मक अधिकार रद्द, आदेशानंतर ठिकठिकाणी निदर्शने

या घटनेमुळे अजमेर दरगाहचे दीवान जैनुल आबेदीन अली खान यांनी या घटनेविरोधात निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कोणताच धर्म मानवताविरोधात जात नाही. इस्लाम धर्म शांतीचा संदेश देतो. इंटरनेटवरून समोर आलेल्या व्हिडिओनुसार काही लोकांनी एका गरीब इसमाची क्रूर हत्या केली आहे. इस्लाम धर्मात एखाद्याची हत्या दंडनीय अपराध मानला जातो. आरोपी हे काही कट्टरपंथी समूहाचे समर्थक आहेत. ज्यांना हिंसेतूनच समाधान मिळतं. त्यामुळे आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. भारतातील मुस्लिम लोक आपल्या मातृभूमित कधीच तालिबानी मानसिकतेचं समर्थन करणार नाहीत, असंही अली खान म्हणाले.

हेही वाचा – मुकेश अंबानींनी जिओच्या संचालकपदाचा दिला राजीनामा, आकाश अंबानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

जमीयत उलेमा-ए-हिंद चे महासचिव मौलाना हकीमुद्दीन कासमी यांनीही याप्रकरणी निषेध नोंदवला आहे. या हत्येत ज्यांचा हात आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं ते म्हणाले आहेत. ही हत्या देशाच्या कायद्याविरोधात आणि आपल्या धर्माविरोधात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपल्या देशात कायदा पाळला जातो. त्यामुळे कायदा हातात घेण्याचा कोणालाच अधिकार नाही.

हेही वाचा अमेरिकेत एका ट्रकमध्ये 46 मृतदेह सापडल्याने खळबळ, ट्रकचालक फरार

या हत्येत आरोपी असलेले रियाज अख्तरी आणि गौस मोहम्मद यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, एका व्हिडिओच्या या माध्यमातून या आरोपींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही हत्येची धमकी दिली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -