घरताज्या घडामोडीउदयपूर हत्याकांड! पोलीस अलर्ट मोडवर, तपासासाठी एसआयटी गठीत

उदयपूर हत्याकांड! पोलीस अलर्ट मोडवर, तपासासाठी एसआयटी गठीत

Subscribe

या घटनेचा तपास एसआयटी (SIT) करणार आहे. यासाठी एडीजी एसओजी अशोक राठोड यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय एसआयटी (SIT) समिती गठीत करण्यात आली आहे.

राजस्थानमधील उदयपूर (Udaipur) येथे नुपूर शर्माचे समर्थन (Nupur Sharma) करणाऱ्या टेलरची दिवसाढवळ्या तलवारीने गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना मंगळवारी घडली. हल्लेखोरांनी या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. कन्हैयालाल तेली (४०) (Kanhailal Teli) असे मृत टेलरचे नाव आहे. कपडे शिवण्याच्या बहाण्याने दोन व्यक्ती दुकानात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कन्हैया लालवर तलवारीने सपासप वार करत त्याचा गळा चिरला. यात कन्हैयालालचा सहकारीही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे. (Udaipur Killing! police on alert mode, SIT formed for investigation)

हेही वाचा – नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्या टेलरची तलवारीने गळा चिरून हत्या, व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

दरम्यान, या घटनेचा तपास एसआयटी (SIT) करणार आहे. यासाठी एडीजी एसओजी अशोक राठोड यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय एसआयटी (SIT) समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये प्रफुल कुमार, पोलीस महानिरीक्षक एटीएस (एसआयटी प्रभारी), गौरव यादव पोलिस अधिक्षक एसओजी, गोपाल स्वरूप मेवारा अतिरिक्त पोलिस अधिक्षक सीआयडी गुन्हे शाखा उदयपूर आणि अनंत कुमार अतिरिक्त पोलिस अधीक्षक एटीएस उदयपूर (संशोधन अधिकारी) आहेत. एसआयटी घटनेच्या सर्व पैलूंचा बारकाईने तपास करेल आणि राज्य सरकारला अहवाल देईल. विभागाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

हेही वाचा – उदयपूर हत्याकांड! मुस्लिम भारतात तालिबानी मानसिकता रुजवणार नाहीत, अजमेर दर्ग्याच्या दिवाणांना विश्वास

- Advertisement -

तसेच, या घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहता पोलीस मुख्यालयाने संपूर्ण राजस्थानातील पोलीस विभागाला सतर्क करून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलीस पूर्ण अलर्ट मोडवर आहेत. उदयपूरमधील ही भीषण हत्या लक्षात घेऊन पोलीस महासंचालक एमएल लाथेर यांनी सर्व रेंज प्रभारी आणि अतिरिक्त महासंचालकांना पुढील आदेश येईपर्यंत संबंधित रेंज मुख्यालयातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. खबरदारी घेत पोलीस अधिकारी आणि जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – आसामच्या पूरग्रस्तांना आमीर खानकडून २५ लाखांची मदत

राजधानी जयपूरमध्येही सर्व स्टेशन प्रभारी आणि एसीपींना मुख्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी सर्व स्टेशन प्रभारी आणि ACC यांना मुख्यालयात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि एसीपींना मुख्यालय आणि पोलीस ठाणे न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – लसीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल, स्वदेशी mRNA लसीला मान्यता

मंगळवारी टेलर कन्हैयालालची उदयपूरमध्ये भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती पाहता उदयपूरमधील अनेक पोलीस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील एक महिन्यासाठी राज्यभरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीपासून पुढील २४ तासांसाठी राज्यभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -