Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश कन्हैयालालच्या मारेकऱ्यांवर संतप्त जमावाचा हल्ला, चपलांसह,लाठ्या, काठ्यांनी तुडवलं

कन्हैयालालच्या मारेकऱ्यांवर संतप्त जमावाचा हल्ला, चपलांसह,लाठ्या, काठ्यांनी तुडवलं

Subscribe

न्यायालयाबाहेर जमा झालेल्या संतप्त जमावाने आरोपींवर अचानक हल्ला केला.  संतप्त जमावाने चपलाबरोबरच लाठ्या काठ्यांनी या आरोपींना झोडपून काढले.

राजस्थानमधील उदयपूर येथील टेलर कन्हैयालालच्या हत्याप्रकरणातील चार आरोपींना आज शनिवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत जयपूरच्या एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर जमा झालेल्या संतप्त जमावाने आरोपींवर अचानक हल्ला केला.  संतप्त जमावाने चपलाबरोबरच लाठ्या काठ्यांनी या आरोपींना झोडपून काढले. पोलिसांनी वेळीच जमावाला पांगवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, चारही आरोपींना १२ जुलैपर्ंयत एनआयएची कोठडी देण्यात आली आहे.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे कन्हैया लालने समर्थन केले होते. त्यातूनच चार दिवसांपूर्वी त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांना उदयपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलेही. पण हत्याकांडाच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण असून कन्हैया लालच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याची मागणी होत आहे. तपासादरम्यान या मारेकऱ्यांचे पाकिस्तान कनेक्शन समोर आल्याने गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

- Advertisement -

आज आरोपींना जयपूर येथील एनआयएच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी हजारोच्या संख्येने जमाव न्यायालयाबाहेर उभा होता. कन्हैया लाल अमर रहे च्या घोषणा करत होत्या. तसेच या जमावामध्ये वकीलही होते . जमावाकडून आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी करण्यात येत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्यानंतर पाच तास न्यायालयात बंद दरवाजाआड याप्रकरणाची सुनावणी सुरू होती. सुनावणीनंतर पोलीस आरोपींना घेऊन बाहेर येताच जमावाने अचानक आरोपींवर हल्ला केला. लाठ्या काठ्या चपलांनी लोक त्यांना बदडत होते. यावेळी पोलिसांनी आरोपींना बचावासाठी पोलीस व्हॅनवरही चढवले. पण शेकडोच्या संख्येत असलेल्या जमावाने तेथूनही त्यांना खाली खेचून काढत तुडवले.

- Advertisement -
- Advertisement -
Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -