कन्हैया लाल प्रमाणे तुम्हालाही ठार करणार- नवीन कुमार जिंदल यांना धमकी

नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे भाजपचे माजी नेते नवीन कुमार जिंदल यांनाही कन्हैया लाल प्रमाणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने उदयपूर येथे कन्हैया लाल या टेलरची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेस २४ तासही उलटत नाहीत तोपर्यंत नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे भाजपचे माजी नेते नवीन कुमार जिंदल यांनाही कन्हैया लाल प्रमाणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जिंदल यांना अज्ञात मेल आला असून त्यात कन्हैया याच्या हत्येची व्हिडीओ क्लिप पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी जिंदल यांनी दिल्ली पोलिसांकडे टि्वटच्या माध्यमाने तक्रार केली आहे.

जिंदल यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की आज सकाळी ६.४३ मिनिटांनी मला तीन ई मेल आले आहेत. या मेलमध्ये उदयपूर येथील कन्हैयालालच्या हत्येचा व्हिडीओ बरोबरच तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना अशाच प्रकारे ठार करण्यात येईल अशी धमकी देण्यात आल्याचे जिंदल यांनी म्हटले आहे.

नुपूर शर्मा यांच्याबरोबरच पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल भाजपने नवीन कुमार जिंदल यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे . जिंदल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख होते. पण पूर शर्मा आणि जिंदल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव केल्याने देशातच नाही तर जगभऱात त्याचे तीव्र पडसाद उमटले. यामुळे भाजपने या दोघांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.