घरताज्या घडामोडीगर्लफ्रेंडची हत्या करुन तिच्या मृतदेहावर बांधला चबुतरा; तर आई-बाबांना बागेत पुरलं!

गर्लफ्रेंडची हत्या करुन तिच्या मृतदेहावर बांधला चबुतरा; तर आई-बाबांना बागेत पुरलं!

Subscribe

भोपाळच्या प्रसिद्ध आकांक्षा मर्डर प्रकरणातील आरोपी उदयन याला बुधवारी बांकुरा येथील कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बांकुरा हा पश्चिम बंगालमध्ये आहे,  जिथे आकांक्षा राहत होती. २०१६ मध्ये आरोपी उदयनने आपली मैत्रिणी आकांक्षाची हत्या केली आणि बेडरूममध्येच तील दफन केले आणि त्यावर एक चबुतरा बांधला.

आकांक्षा मर्डर प्रकरणातील आरोपी उदयनने पोलिसांना सांगितले होते की, मृतदेह व्यासपीठावर दफन करण्याची कल्पना एका इंग्रजी वाहिनीवरील ‘वॉकिंग डेथ’ नावाच्या वेबसिरीजमधून मिळाली. उदयनने आकांक्षाच्या चबुतऱ्यावर गळफास अडकवला होता. त्यावर त्याने स्वत: जीव द्यायचं ठरवलं होतं.हत्येच्या १० महिने आधी उदयनने आकांक्षाशी मैत्री वाढवली. नंतर ते दोघे भोपाळमध्ये एकत्र राहू लागले. त्यानंतर उदयनं आकांक्षाची हत्या केली आणि घरातच पुरले.

- Advertisement -

१४ जुलै २०१६ ला रात्री आकांक्षा आणि उदयनमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर रात्री आकांक्षा झोपली पण उदयन रात्रभर जागा होता आणि त्याने आकांक्षाला जिवे मारण्याचा कट रचला. १५ जुलैला सकाळी तो आकांक्षाच्या छातीवर बसला आणि उशीने तीचे तोंड दाबले आणि यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने हाताने तिचा गळा दाबला. त्यांच्या भांडणाचं कारण म्हणजे आकांक्षा तिच्या एका मैत्रिणीशी बरचद्या फोनवर बोलायची. याचा उदयनला खूप राग आला आणि त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आकांक्षाच्या हत्येनंतर त्याने मृतदेह दुसर्‍या खोलीत नेला आणि त्यावर सिमेंटचा चबुतरा बांधला. केवळ आकांक्षाचा नाही तर उदयनवर त्याच्या पालकांची हत्या केल्याचाही आरोप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -