Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Udayanidhi Stalin यांनी सनातन धर्माची केली डेंग्यू-मलेरियाशी तुलना; कोण आहे उदयनिधी?

Udayanidhi Stalin यांनी सनातन धर्माची केली डेंग्यू-मलेरियाशी तुलना; कोण आहे उदयनिधी?

Subscribe

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu Chief Minister MK Stalin) यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) सनातन धर्मावर वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे. (Udayanidhi Stalin compared Sanatan Dharma to dengue-malaria; Who is Udayanidhi)

हेही वाचा – चांद्रयान – 3 संदर्भात इस्रोकडून मोठी अपडेट; “…आता काम पूर्ण”

- Advertisement -

उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नईतील एका लेखक संमेलनादरम्यान वक्तव्य केले की, सनातन धर्म हा सामाजिक न्यायाच्या कल्पनेच्या विरोधात असून तो रद्द केला पाहिजे. सनातन धर्म हा मलेरिया आणि डेंग्यूसारखाच आहे, त्यामुळे त्याला विरोध नाही, तर त्याचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. यावेळी त्यांनी असा युक्तिवाद केला की, सनातन ही कल्पना मूळतः प्रतिगामी आहे. जात आणि लिंगाच्या आधारावर लोकांना विभाजित करते आणि मूलभूतपणे समानता आणि सामाजिक न्यायाला विरोध करते. दरम्यान, स्टॅलिन यांच्या मुलाच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद होताना दिसत आहे. अनेक युजर्सनी तामिळनाडूच्या मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सुद्धा उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर सडकून टीका केली आहे.

उदयनिधींकडून लोकसंख्येचा नरसंहाराची हाक

- Advertisement -

अमित मालवीय म्हणाले की, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा मलेरिया आणि डेंग्यूशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ विरोध न करता तो संपवला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ते सनातन धर्म मानणाऱ्या भारतातील 80 टक्के लोकसंख्येच्या नरसंहाराची हाक देत आहेत. द्रमुक हा विरोधी आघाडीचा प्रमुख सदस्य आणि काँग्रेसचा दीर्घकाळ सहयोगी आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत यावर सहमती झाली होती का? असा प्रश्नही अमित मालवीय यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – चीन, पाकिस्तानला पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर; एका वाक्यात फेटाळले सर्व दावे

राहुल गांधी ‘मोहब्बत की दुकान’ म्हणतात, अन् द्रमुक

अमित मालवीय यांनी राहुल गांधीवर निशाणा साधताना म्हटले की, राहुल गांधी ‘मोहब्बत की दुकान’ बद्दल बोलतात, पण काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुकचे वंशज सनातन धर्म संपवण्याची चर्चा करतात. काँग्रेसचे मौन हे नरसंहाराच्या या आवाहनाचे समर्थन का? ‘इंडिया’ आघाडीने त्याच्या नावाप्रमाणेच संधी मिळाल्यास भारताची सहस्राब्दी जुनी संस्कृती नष्ट करेल, असा आरोपही अमित मालवीय यांनी केला.

उदयनिधी यांनी दिलं स्पष्टीकरण 

उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांच्या वक्तव्यावर झालेला गदारोळ पाहून स्पष्टीकरण दिले आहे. अमित मालवीय यांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी लिहिले की, मी कधीही सनातन धर्माचे पालन करणाऱ्या लोकांच्या नरसंहाराची हाक दिली नाही. सनातन धर्म हे एक तत्व आहे, जो जाती आणि धर्माच्या नावावर लोकांना विभाजित करतो. सनातन धर्माचे समूळ उच्चाटन करणे म्हणजे मानवता आणि मानवी समता राखणे होय. मी सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे. मी सनातन धर्मामुळे पीडित आणि उपेक्षित लोकांच्यावतीने बोललो. सनातन धर्म आणि त्याचा समाजावर होणारा नकारात्मक परिणाम यावर व्यापक संशोधन करणारे पेरियार आणि आंबेडकर यांचे विस्तृत लेखन कोणत्याही व्यासपीठावर मांडण्यास मी तयार आहे. माझ्या मार्गावर येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी मी तयार आहे. मग ते कायद्याच्या न्यायालयात असो किंवा लोकांच्या न्यायालयात. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवणे थांबवा, असा इशाराही उदयनिदी स्टॅलिन यांनी अमित मालवीय यांना दिला.

प्रोफेसर मनोज झा यांनी वादग्रस्त वक्तव्याचे केले समर्थन 

प्रोफेसर मनोज झा यांनी संत कबीराच्या दोह्याचे उदाहरण देत उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. प्रतिकांची भाषा समजून घेतली पाहिजे, असे सांगत ते म्हणाले की, सनातन धर्मामध्येही काही विकृती असतील तर त्यावर बोलले पाहिजे. जातीव्यवस्था चांगली आहे का? गटाराच उतरणाऱ्यांची जात एकच का असते? असे प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रीय जनता दलाच्या खासादारांनी स्टॅलिन यांचे वक्तव्यातील प्रतिकं समजून घेण्याची गरज व्यक्त केली आहे.

हेही वाचा – ‘वन नेशन, वन इलेक्शन’ समितीमध्ये सहभागी होण्यास अधीर रंजन चौधरींचा नकार; शाहांना पत्र लिहून म्हणाले…

कोण आहेत उदयनिधी स्टॅलिन?

तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते कलैग्नार उर्फ एम. करुणानिधी यांचे नातू व द्रमुकचे सर्वेसर्वा असेलेले एम. के. स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन आहेत. 43 वर्षीय उदयनिधी स्टॅलिन यांनी अनेक चित्रपटांत अभिनेत्याची भूमिका केली असून काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 2013 मध्ये त्यांना फिल्मफेअरचा पदार्पणातील सर्वोत्तम युवा अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते द्रमुकचे स्टार प्रचारक होते. मात्र त्यांनी वेळोवेळी राजकारणातील प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली. 2019 च्या निवडणुकीत द्रमुकला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांची युवा शाखेच्या चिटणीसपदी निवड झाली. राज्यातील पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी अखेरच्या टप्प्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यावर तोफ डागली. मोदी यांनी छळ केल्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा बळी गेला, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होते. सध्या ते तामिळनाडू सरकारमधील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून काम करत आहेत.

- Advertisment -