नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाम असून भाजपने त्यांचे वक्तव्याची तोडमोड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उदयनिधी स्टलिन यांच्या वक्तव्यासंदर्भात देशभरात त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उदयनिधी स्टलिन यांच्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. पण उदयनिती स्टलिन हे त्यांच्या धर्माबद्दल वक्तव्यावरून मागे हटणार नाही.
उदयनिधी स्टलिन म्हणाले, “मी एका कार्यक्रमात सनातन धर्मबद्दल बोललो. मी जे काही बोललो, ते पुन्हा पुन्हा सांगेन. मी फक्त हिंदू धर्मच नव्हे तर यात सर्व धर्मांचा समावेश केला आहे. मी जातीभेदांबद्दल बोललो. त्याचाही निषेध केला.” पण मी केलेल्या वक्तव्याचे विरोधकांनी मोडूनतोडून करून दाखविल्याचा आरोप उदयनिधी स्टलिन यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा केला.
हेही वाचा – Udayanidhi Stalin यांच्या सनातन धर्माबद्दलच्या वक्तव्यानंतर खर्गेंच्या विधानाने वाद चिघळणार?
या प्रकरणावरून भाजपने उदयनिधी स्टलिनला ‘उदयनिधी हिटलर’ असे नाव दिले. याप्रकरणी इंडियाकडून काँग्रेस ही उदयनिधी स्टलिनच्या बाजूने उभी राहिली. या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी उदयनिधी स्टलिनची बाजून प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांक खर्गे म्हणाले की, जो धर्म समानतेचा पुरस्कार करत नाही. तुम्हाला माणूस म्हणून सन्मानाची हमी देत नाही, तो धर्म नाही. माझ्या मते जो धर्म तुम्हाला समान अधिकार देत नाही किंवा तुम्हाला माणसासारखी वागणूक देत नाही, तो एक रोग आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रियांक खर्गे यांनीही सनातन धर्माला रोग म्हटल्याने वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांचे उदयनिधी स्टॅलिनच्या ‘त्या’ वक्तव्याला समर्थन; ट्वीट करत सांगितला ‘सनातन’ शब्दाचा अर्थ
काय आहे संपूर्ण प्रकरण
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी राजधानी चेन्नईमध्ये एका सभेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया, कोरोना सारख्या आजारांसोबत केली. ते म्हणाले, ‘मच्छर, डेंग्यू, कोरोना हे असे रोग आहेत, ज्यांचा आम्ही फक्त विरोध करु शकत नाही. तर यांचे समूळ उच्चाटन करावं लागतं. सनातन धर्म देखील असाच आहे. सनातनचा फक्त विरोध करुन चालणार नाही, तर त्याला मुळातून संपवावे लागणार आहे.’