तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. भाजपने तर काँग्रेसला या वक्तव्यावरून घेरलं आहे. परंतु , असं असूनही उदयनिधी मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हणत आहेत. इतकच नाही तर आता त्यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह विधान करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं उदाहरण दिलं आहे. यावरूनही आता हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. (Udayanidhi Stalin s attack on Sanatan Dharma continues Now the President Draupadi Murmu s name know in details)
उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, केंद्र सरकारने नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निमंत्रित न करणं हे सनातन जातीच्या भेदभावाचे उदाहरण आहे. या विषयावर आपण केवळ द्रुमकची दीर्घकाळापासूनची भूमिका अधोरेखित केली, असंही ते म्हणाले.
उदयनिधी स्टॅलिन हे सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम आहेत. तसंच याबाबत कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला आपण तयार असल्याचं ते म्हणाले. आता ते म्हणाले की, माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नसणं, हे सनातन धर्मांच उत्तम उदाहरण आहे. तसंच यावेळी त्यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.
भाजपनं विरोधकांच्या आघाडीला उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरून माफी मागायला सांगितलं आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीतही स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरून वेगवेगळी वक्तव्यं समोर आली आहेत. इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या काही पक्षांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तर, काहींनी उदयनिधी यांनी बोलताना संयम पाळावा, असा सल्लाही दिला आहे.
ममता बॅनर्जींचा सल्ला
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला तामिळनाडूच्या लोकांबद्दल खूप आदर आहे, पण माझी त्यांना नम्र विनंती आहे की, प्रत्येक धर्माच्या स्वत:च्या भावना असतात. अशा कोणत्याही प्रकरणात आपण अडकू नये. कोणताही वर्ग दुखावला जाईल, असं कोणीही वागू नये.
धीरेंद्र शास्त्रींची संतप्त प्रतिक्रिया
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, रावणाच्या खानदानातील लोक आहेत. जर भारतात राहणाऱ्या एखाद्या भारतीयानं असं म्हटलं असेल तर भारतात राहणाऱ्या संपूर्ण सनातनी लोकांच्या ह्रदयावर त्यांनी आघात केला आहे. हा प्रभू रामचंद्रांचा देश आहे. या भूमीवर सूर्य आणि पाणी राहणार तोपर्यंत हा सनातन धर्म राहणार, असे लोक भरपूर आले आणि गेले. अशा जनावरांना उत्तर देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा: सनातन धर्म वक्तव्यावरून वाद: उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गेंविरोधात गुन्हा दाखल )