घरदेश-विदेशभाजपची ज्योतिरादित्य, उदयनराजे, आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी

भाजपची ज्योतिरादित्य, उदयनराजे, आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी

Subscribe

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले मध्य प्रदेशातील मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. यासोबत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर केली.
२६ मार्च रोजी होणार्‍या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवार यादी जाहीर केली. त्यात मित्र पक्षांच्या दोन उमेदवारांसह एकूण ११ जणांची नावे आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचेही नाव त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. एकूण नऊ राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावे यात जाहीर करण्यात आली आहे.

असाम (भुवनेश्वर कालीता), बिहार (विवेक ठाकूर), गुजरात (अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा), झारखंड (दीपक प्रकाश), मणिपूर (लिएसेंबा महाराजा), मध्य प्रदेश (ज्योतिरादित्य शिंदे, हर्ष सिंह चौहान), महाराष्ट्रातून (उदयनराजे भोसले, रामदास आठवले), राजस्थान (राजेंद्र गहलोत) यांचा समावेश आहे.

- Advertisement -

भाजपने महाराष्ट्रातून अजून तिसरा उमेदवार जाहीर केलेला नाही. तिसर्‍या जागेसाठी एकनाथ खडसे, विजया रहाटकर, संजय काकडे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच भाजपकडून अन्य राज्यातील उमेदवारी दिला जाऊ शकतो. जर महाविकास आघाडीकडून चार, भाजपकडून तीन उमेदवार दिल्यास राज्यसभेसाठी मतदान घेण्यात येणार नाही. उमेदवारी अर्ज वैध ठरून माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून राज्यसभेवर निवडून गेलेल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -