घरदेश-विदेशसावरकरांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये दुरावा? खर्गेंनी बोलावली बैठक, पण...

सावरकरांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये दुरावा? खर्गेंनी बोलावली बैठक, पण…

Subscribe

उद्धव ठाकरे यांची मालेगावची सभा झाल्यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राहुल गांधी यांच्यावरून जोरदार राजकारण तापलेलं दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांची मालेगावची सभा झाल्यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राहुल गांधी यांच्यावरून जोरदार राजकारण तापलेलं दिसत आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्त्यव्य केल्यानंतर भाजप आणि आता ठाकरे गटामध्ये जोरदार राजकारण सुरू झालंय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही अशा शब्दात उद्वव ठाकरेंनी कॉंग्रेसविरोधी भूमिका घेतल्यानं आता महाविकास आघाडीत फूट फडणार की काय? या चर्चांना उधाण आलंय. यावरून आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाविकास आघाडीची एक बैठक बोलावली होती. परंतू या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते, पण उद्धव ठाकरे यांनी दांडी मारल्यानं आता या चर्चांना आणखी हवा मिळू लागली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत उपस्थित न राहण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. काँग्रेस नेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे ते नाराज असल्याचं सांगण्यात आलं आहे. खरं तर, भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधीनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली, त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी ‘मी सावरकर नाही, मी गांधी आहे’ असं सांगितलं.

- Advertisement -

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं होतं. मात्र उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला. राहुल गांधींनी वीर सावरकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांच्या बैठकीत शिवसेना सहभागी होणार नाही, असं पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले.

राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राहुल गांधींच्या “माझे नाव सावरकर नाही…” यांच्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर आता शिंदे-भाजपने त्यांना पूर्णपणे घेरलंय.एक तर संपूर्ण काँग्रेसविरोधी भूमिका स्पष्ट करा, अन्यथा हे नाटक असल्याचं मान्य करा, अशा आशयाची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. ‘आम्ही एकत्र आलो आहोत, हे खरे आहे, या देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, हे मला राहुल गांधींना सांगायचे आहे,’ असे विधानही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी त्यांना सांगितल्यानंतर आता त्यावरून भाजपने आणि शिवसेनेने राजकारण सुरु केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावरकरांच्या मुद्यावरून राजकारण सुरु केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या पक्षाने आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे ते नाराज असल्याचे त्यांच्या पक्षाने सांगितले. खरं तर, राहुल गांधींनी जेव्हा भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली तेव्हा ते म्हणाले- ‘मी सावरकर नाही, मी गांधी आहे’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -