घरदेश-विदेशUddhav Thackeray: निवडणूक रोख्यांचं बिंग फुटलं म्हणून अरविंद केजरीवालांना अटक; उद्धव ठाकरेंचा...

Uddhav Thackeray: निवडणूक रोख्यांचं बिंग फुटलं म्हणून अरविंद केजरीवालांना अटक; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Subscribe

नवी दिल्ली:  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीने आज लोकतंत्र बचाओ या महारॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray Arvind Kejriwal arrested for election bond scam Serious accusation of Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात आता हुकूमशाही येईल, असं म्हणता येणार नाही. हुकूमशाही ही आल्यातच जमा आहे. निवडणुका या खुल्या वातावरणात घेतल्या गेल्या पाहिजेत. अनेक व्यक्ती असे आहेत ज्यांच्यावर आरोप करून भाजपाने त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांच्यावरील केसेस बंद केल्या आणि जे मोदींविरोधात बोलतात त्यांच्यावर केसेस टाकून त्यांना अटक केली जात आहे. त्यामुळे ही लोकशाही नाही.

- Advertisement -

सगळे ठग हे सध्या भाजपामध्ये आहेत. निवडणूक रोख्यांचं बिंग फुटलं आहे. ज्यांच्यावर धाडी टाकल्या त्यांनी निवडणूक रोख्यांसाठी पैसे दिले किंवा मग त्या कंपन्यांना रोखे मिळाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. हे सर्व बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली, असा गंभीर आरोप ठाकरेंनी मोदी सरकारवर केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाराष्ट्रात ज्याप्रकारे गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यानंतर गद्दारी करून सरकार स्थापन करण्यात आले. भाजपाने सगळ्या चित्र-विचित्रांना बरोबर घेण्याचे काम सुरू केले आहे. आता भाजपाकडेच जे ठग आहेत. त्यांच्यावरील केसेस मागे घेतल्या. मात्र, निवडणूक रोख्यांबद्लल भाजपाचे बिंग फुटले, त्याची चर्चा होऊ नये,म्हणून केजरीवाल यांना अटक करण्यात आली, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

- Advertisement -

निवडणूक रोख्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा लाभार्थी आहे. यामध्ये अनेक अशा कंपन्या आहेत, ज्यांच्यावर धाडी टाकल्या गेल्या. त्यानंतर भाजपाला निवडणूक रोखे मिळाले आणि त्यानंतर त्याच कंपन्यांना अनेक कंत्राटं मिळाली. हे अशा प्रकारचे बिंग फुटल्यावर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा: Loksabha 2024: सगळे ठग भाजपात गेल्याने आम्ही ठगमुक्त; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -