घरदेश-विदेशमोदींचे कोडे बसा सोडवत ! - सामना

मोदींचे कोडे बसा सोडवत ! – सामना

Subscribe

मोदी यांनी टाकलेल्या कोड्याने अनेकांच्या कुंडल्या भीतीने फडफडल्या असतील, पण नुसत्याच लटकवत ठेवलेल्या तलवारी भ्रष्टाचार कसा संपवणार, हा प्रश्न आहेच. असा सवाल आज सामनाच्या आग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे.

मोदी हे बुधवारी भंडारा-गोंदिया मतदारसंघात येऊन गेले. तेथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांवर हल्ला केला. मोदींनी सभेत घातेलेल्या एका कोड्यावर आज सामन्याच्या अग्रलेखातून शिवसेना प्रमुख्यांनी मोदींना प्रश्न विचारला आहे. मोदी यांनी भंडाऱ्यात येऊन एक कोडे टाकले व हसत हसत निघून गेले. तिहार तुरुंगातील कोणीतरी आपले तोंड उघडेल आणि मग आपणही तिहार जेलमध्ये जाऊ ही भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेडसावत आहे, असे मोदी यांनी जाहीर केले. तिहार जेलमध्ये कोण आहे व त्याने तोंड उघडले तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते तुरुंगात जातील, हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे. मोदी यांनी टाकलेल्या कोड्याने अनेकांच्या कुंडल्या भीतीने फडफडल्या असतील, पण नुसत्याच लटकवत ठेवलेल्या तलवारी भ्रष्टाचार कसा संपवणार, हा प्रश्न आहेच. असा सवाल आज सामन्याच्या आग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे.

मोदी यांनी भंडाऱ्यात येऊन एक कोडे टाकले व हसत हसत निघून गेले. त्यामुळे कुणाची झोप उडाली? तिहार जेलमध्ये कोण आहे व त्याने तोंड उघडले तर काँगेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते तुरुंगात जातील, हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे. अर्थात पंतप्रधानांनी असे कोड्यात बोलायला नको होते व जे आहे ते स्पष्ट सांगून संभ्रम दूर करायला हवा होता. असं ही अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

हे मुद्दे अग्रलेखात अधोरेखित

त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर अग्रलेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. 2019 साली निवडणूक प्रचारात मोदी यांनी सांगितले आहे की, 72 वर्षांत काँग्रेसने इतके खड्डे केले ते भरण्यातच पाच वर्षे निघून गेली. त्या भरलेल्या खड्ड्यांवर विकासाचा हायवे बनवण्यासाठी आणखी पाच वर्षे हवी आहेत. मोदी यांच्या बोलण्यात तथ्य आहे. काँग्रेसने घाण केली ती साफ करायला वेळ लागेल. मोदी यांचे राज्य आल्यापासून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. घोटाळे करणाऱ्यांना जरब बसली.

- Advertisement -

अशा काही व्यक्ती आहेत व त्या आधीच्या सरकारात ‘लॉबिंग’ करत होत्या. उद्योग व नागरी हवाई क्षेत्रात नियम मोडून कामे करून देणाऱ्या या व्यक्तींनी स्वतः कमाई केली व काही मंत्र्यांना कमाई करून दिली. या व्यक्तींमध्ये दीपक तलवारचे नाव सातत्याने घेतले जाते. देशद्रोहाचे कलम रद्द करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले तसे मनी लाँजरिंग गुन्ह्याचे कलमही ते रद्द करणार आहेत काय? जेलचा भत्ता अनेकांना खावा लागेल अशी स्थिती आहे. आपले सरकार आले तर पाचशेच्या जुन्या नोटा बदलून देऊ. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू, असे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. अशा नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक मान्यता देईल काय? असा प्रश्न लोकांना पडू शकतो. मोदी यांनी टाकलेल्या कोड्याने अनेकांच्या कुंडल्या भीतीने फडफडल्या असतील, त्यामुळे नुसत्याच तलवारी लटकत ठेऊ नका. तर भ्रष्टाचार संपवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -