घरदेश-विदेशमुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरे प्रथमच दिल्लीला; मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांची भेट

मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरे प्रथमच दिल्लीला; मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांची भेट

Subscribe

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील सोबत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एखादा विषय घेऊन पहिल्यांदाच दिल्लीत गेले आहेत. यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी याआधी २१ फेब्रुवारी २०२० रोजी पंतप्रधान मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. मात्र ती सदिच्छा भेट होती. त्यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आणि सुपुत्र आदित्य ठाकरे देखील होते. मात्र यावेळेची भेट वेगळी आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. खासदार संभाजीराजे यांनी १६ जुनोअसून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री त्यांच्या शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं की मराठा आरक्षणासाठी आम्ही आधी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेऊ त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ. त्यानुआर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत.

उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवारांमध्ये ‘वर्षा’ बंगल्यावर तासभर खलबतं

उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नती आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -