राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात ममता बॅनर्जींच्या बैठकीला उद्धव ठाकरे अनुपस्थित, ‘हे’ आहे कारण

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (presidential election) संयुक्त रणनीती तयार करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह २२ विरोधी नेत्यांना पत्र पाठवले आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (presidential election) संयुक्त रणनीती तयार करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी विरोधी पक्षांची बैठक (meeting) बोलावली आहे. मात्र, या बैठकीला शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Shiv Sena chief and Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) उपस्थित राहणार नाहीत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी ही माहिती दिली. उद्धव ठाकरे यांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते या बैठकीत सहभागी होणार नाहीत.

शिवसेनेच्या वतीने या बैठकीला कोण उपस्थित राहणार, याबाबत सध्या निर्णय झालेला नाही. संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना १५ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या सभेचे निमंत्रण मिळाले आहे. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. आमच्या पक्षाचे एक प्रमुख नेते बैठकीत सहभागी होणार आहेत.

येचुरीही ममताविरोधात

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सवादीचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी एकसंध विरोधकांना एकत्र करण्याचा एकतर्फी प्रयत्न केल्याने नुकसानच होईल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची १५ जून रोजी होणारी बैठक आधीच ठरलेली आहे, असे येचुरी म्हणाले.

ममता यांचे पत्र

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (presidential election) संयुक्त रणनीती तयार करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह २२ विरोधी नेत्यांना पत्र पाठवले आहे. बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) ने एका निवेदनात म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांनी सर्व पुरोगामी विरोधी शक्तींना 15 जून रोजी दुपारी 3 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लब, नवी दिल्ली येथे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्याचे आणि भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.