घरताज्या घडामोडीरामलल्लामुळेच महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री - राऊत

रामलल्लामुळेच महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री – राऊत

Subscribe

रामलल्लाच्या कृपेने महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री विराजमान झाले.

‘रामलल्लाच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले आहेत. हा रामलल्लाचा प्रसाद असल्याचे आम्ही मानत आहोत’, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केली आहे. त्यामुळे उद्या (शनिवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहे. परंतु सध्या देशामध्ये करोना व्हायरसचे थैमान सुरु असल्यामुळे शरयू नदीची आरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत काय म्हणाले

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रथम लखनौला येतील. त्यानंतर ते अयोध्येला जातील’,असे राऊत यावेळी म्हणाले आहे. ‘तसेच शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण, गुरुवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी शरयू तिरावर होणाऱ्या आरतीबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चे दरम्यान आरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव पसरतोय त्यामुळे जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्र्यांसोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि काही नेते मंडळी ही त्याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत शांतता राहावी, तसेच मंदिर उभारणीतही शिवसेना सहभागी होऊ इच्छिते. मात्र, त्याबाबत मुख्यमंत्री माहिती देणार आहेत. तसेच त्यांच्या दौऱ्याला कोणाचाही विरोध नाही. कारण मी सगळ्यांना भेटलो आहे. त्याचप्रमाणे कोणाच्या विरोधावर आमचे लक्ष नाही. त्यामुळे सर्वांनी रामलल्लाचे दर्शन घ्यावे,’ अशी आमची इच्छा आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्र्याचा दौरा हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यामुळे यामध्ये कोणतेही राजकारण नसून राजकारण आणण्याची गरज देखील नाही, असे देखील ते पुढे म्हणाले.


हेही वाचा – रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये करोना व्हायरसची दहशत; बायोमेट्रिक मशीन बंद करण्याची मागणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -