Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश भाजपाचा उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसवर निशाणा; वेणुगोपाल म्हणाले, आमचा दृष्टीकोण स्पष्ट...

भाजपाचा उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसवर निशाणा; वेणुगोपाल म्हणाले, आमचा दृष्टीकोण स्पष्ट…

Subscribe

नवी दिल्ली – तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे चिरंजीव आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपाच्या हाती मोठा मुद्दा हाती लागला आहे. या मुद्यावरुन भाजपा नेते काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत.

शनिवारी (२ सप्टेंबर) एका सभेला संबोधित करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी, ‘सनातन धर्म मच्छर, डेंग्यू, कोरोना आणि मलेरिया सारखा आहे. त्याचे समूळ उच्चाटन आवश्यक आहे.’ असे वक्तव्य केले होते. यावरुन भाजपा नेते तामिळनाडू सरकारवर टीका करत आहेत, उदयनिधींवर कारवाईची मागणी करत आहेत. एम. के. स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष पहिल्या दिवसापासून ‘इंडिया’ आघाडीत सहभागी आहे. त्यामुळे काँग्रेसवरही हल्लाबोल होत आहे. या प्रकरणी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, ‘सर्वांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. सर्वांनी सर्व धर्मांचा सन्मान केला पाहिजे.’

काय आहे संपूर्ण प्रकरण

- Advertisement -

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी राजधानी चेन्नईमध्ये एका सभेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया, कोरोना सारख्या आजारांसोबत केली. ते म्हणाले, ‘मच्छर, डेंग्यू, कोरोना हे असे रोग आहेत, ज्यांचा आम्ही फक्त विरोध करु शकत नाही. तर यांचे समूळ उच्चाटन करावं लागतं. सनातन धर्म देखील असाच आहे. सनातनचा फक्त विरोध करुन चालणार नाही, तर त्याला मुळातून संपवावे लागणार आहे.’

काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

डीएमके नेत्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल म्हणाले, “यासंबंधी आमचा दृष्टीकोण स्पष्ट आहे. ‘सर्व धर्म समभाव’ ही आमची विचारधारा आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांची विचारधारा मानण्याचा आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही सर्वांच्या विचारांचे स्वागत करतो.”

- Advertisement -

भाजपचा पलटवार

भारतीय जनता पक्षाला हा ऐता मुद्दा ‘इंडिया’ आघाडीविरोधात मोर्चा उघडण्यासाठी मिळाला आहे. भाजप नेते सनातन मुद्यावरुन ‘इंडिया’ आघाडी आणि डीएमकेविरोधात आक्रमक झाले आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, असे कित्येक आले आणि गेले मात्र सनातन धर्माचं काहीच बिघडवू शकले नाही.

याशिवाय भाजप खासदार रवीशंकर प्रसाद यांनी उदयनिधी आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांवर सनातन धर्मावरुन टीका केली. रवीशंकर प्रसाद म्हणाले, ‘राहुल गांधीजी तुमच्या आघाडीकडून सनातन धर्माचा अपमान होत आहे. तुम्ही शांत का आहे? तुम्ही मंदिरांमध्ये फक्त देखाव्यासाठी जाता का? हा संपूर्ण ग्रूप (इंडिया आघाडी) मतांसाठी घोर अहिंदू बनू शकतो.’

- Advertisment -