नवी दिल्ली : ‘सनातन धर्म डेंग्यू आणि मलेरिया सारखा आहे. त्याला केवळ विरोध नको, तर त्याचे ‘निर्मूलन’ केले पाहिजे, असे वक्तव्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केले. ज्यानंतर यामुळे राजकीय वातावरण तापले असून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून या वक्तव्याचा काँग्रेसच्या नेत्यांकडून सुद्धा विरोध करण्यात आला आहे. स्टॅलिन यांच्या या विधानाचा अनेकांनी निषेध केला असून आता हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या प्रकरणी आता माजी न्यायाधीश आणि नोकरशहांनी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये 14 माजी न्यायमूर्तींनी स्वाक्षरी केली असून उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. (Udhayanidhi Stalin’s ‘sanatan’ statement will rage, former judge’s letter to Supreme Court)
हेही वाचा – सनातन धर्माबद्दल केलेल्या ‘या’ वक्तव्यावर उदयनिधी स्टलिन ठाम; वाचा नेमके प्रकरण काय
262 लोकांनी त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र सर्वोच्च न्यायालयाला पाठवले आहे. पत्र पाठवणाऱ्यांमध्ये 130 निवृत्त नोकरशहा आणि 118 माजी लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. या विधानाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन कारवाई करावी, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांनीच या प्रकरणी थेट सुप्रीम कोर्टाला पत्र लिहित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे उदयनिधी स्टॅलिन यांचे वडील एम के स्टॅलिन हे विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडूनच नव्हे तर तर इंडिया आघाडीतील काही पक्षाच्या नेत्यांकडून सुद्धा विरोध करण्यात आला आहे. स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोध करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी सनातन धर्माचा आदर करते. हे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. लोकांच्या भावना दुखावतील अशा कोणत्याही घटनेत आपण सहभागी राहू नये, असा सल्ला देखील त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे.
तर या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. “जो धर्म समानतेचा पुरस्कार करत नाही. तुम्हाला माणूस म्हणून सन्मानाची हमी देत नाही, तो धर्म नाही. माझ्या मते जो धर्म तुम्हाला समान अधिकार देत नाही किंवा तुम्हाला माणसासारखी वागणूक देत नाही, तो एक रोग आहे.” त्यामुळे उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रियांक खर्गे यांनीही सनातन धर्माला रोग म्हटल्याने वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.