घर देश-विदेश उफ्फ तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श... Animation Video द्वारे काँग्रेसची मोदींवर टीका

उफ्फ तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श… Animation Video द्वारे काँग्रेसची मोदींवर टीका

Subscribe

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची नांदी आता दिसू लागली आहे. सोशल मीडियावरून भाजपाकडून काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीवर निशाणा साधला जात असतानाच काँग्रसकडूनही त्यावर पलटवार करण्यात येत आहे. काँग्रेसने आता Animation Videoतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – दुष्काळी परिस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचे रूप, जयंत पाटील यांची बोचरी टीका

- Advertisement -

साधारण महिन्याभरापूर्वी शोले चित्रपटातील ‘कितने आदमी थे…’ या लोकप्रिय संवादाचा आधार घेत काँग्रेसने Animation Video द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. त्यापाठोपाठ आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’ चित्रपटातील ‘क्या है तुम्हारे पास?’ हा लोकप्रिय डायलॉगचा आधार घेत काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

तुम्ही ज्या मार्गाने जात आहात, त्याने तुम्हाला कधीही सत्ता मिळणार नाही, असे नरेंद्र मोदी या व्हिडीओमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सांगताना दिसतात. त्यावर उत्तर देताना, मी ज्या मार्गाने जात आहे, त्याचे परिणाम काहीही झाले तरी चालेल, पण तुम्ही देशाला ज्या मार्गावरून नेत आहात, त्याचे परिणाम वाईट होणार आहेत, असा इशारा राहुल गांधी यांनी दिल्याचे या व्हिडीओत दाखवले आहे.

हेही वाचा – शासनाने युवकांच्या आयुष्याशी खेळू नये, रोहित पवारांकडून ‘तो’ जीआर रद्द करण्याची मागणी

या व्हिडीओच्या शेवटी, मेरे पास ईडी है, पुलिस है, सत्ता है, पैसा है, दोस्त है… क्या है तुम्हारे पास? असा प्रश्न मोदी हे राहुल गांधी यांना विचारतात. त्यावर राहुल गांधी सांगतात, तुमच्यासोबत एक ‘मित्र’ आहे, माझ्याबरोबर पूर्ण देश आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ रीट्वीट करण्यात आला असून त्याला सुमारे दोन तासात जवळपास 11 हजार व्ह्यूज मिळाले असून 3 हजार 500हून अधिक जणांनी रीट्वीट केले आहे.

- Advertisment -