घरदेश-विदेशUFO: आकाशात UFO दिसताच राफेल लढाऊ विमानांनी केला पाठलाग, नेमकं घडलं काय?

UFO: आकाशात UFO दिसताच राफेल लढाऊ विमानांनी केला पाठलाग, नेमकं घडलं काय?

Subscribe

रविवारी मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आकाशात UFO (अज्ञात उडणारी वस्तू) दिसल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर हा UFO शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केले.

इंफाळ: रविवारी मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आकाशात UFO ( Unidentified flying object- अज्ञात उडणारी वस्तू) दिसल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर हा UFO शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केले. UFO बद्दल काहीही सापडले नाही. यूएफओमुळे इंफाळ विमानतळावरील हवाई सेवा बराच काळ विस्कळीत झाली होती. हवाई दलही या घटनेची चौकशी करत आहे. (UFO UFO was seen in the sky Rafale fighter jets chased it what really happened Imphal Manipur )

यूएफओमुळे हवाई सेवा प्रभावित

वृत्तानुसार, रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास इंफाळ विमानतळाच्या आसपास यूएफओ दिसला. त्यामुळे इंफाळ विमानतळावरील व्यावसायिक विमानसेवेवरही परिणाम झाला. भारतीय हवाई दलाला UFO दिसल्याची माहिती मिळताच राफेल लढाऊ विमानाने UFO शोधण्याच्या उद्देशाने जवळच्या एअरबेसवरून उड्डाण केले. तथापि, खूप प्रगत सेन्सर असूनही आणि बराच वेळ उड्डाण करूनही, UFO चा मागोवा घेता आला नाही. यानंतर हे लढाऊ विमान एअरबेसवर परतले.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या एअरबेसवरून लढाऊ विमानांनी केले उड्डाण

यानंतर आणखी एका फायटर प्लेननेही उड्डाण घेतले पण तरीही यूएफओचा काहीही पत्ता लागला नाही. हवाई दलाने सांगितले की, इंफाळ विमानतळावर UFO पाहिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ देखील आहे, ज्याचा हवाई दल आणि संबंधित तपास यंत्रणा तपास करत आहेत. हवाई दलाने सांगितले की, UFO ची माहिती मिळताच हवाई संरक्षण प्रतिसादाचा भाग म्हणून लढाऊ विमाने पाठवण्यात आली. पश्चिम बंगालमधील हाशिमारा एअरबेसवरून लढाऊ विमानांनी उड्डाण केले.

मणिपूरची सीमा तीन राज्ये आणि एका देशाला लागून

या घटनेची माहिती तातडीने हवाई दलाला देण्यात आली. त्यांची पूर्व कमांड शिलाँगमध्ये आहे. मणिपूरची सीमा नागालँड, मिझोराम आणि आसाम या राज्यांशी जोडलेली आहे. याशिवाय मणिपूरची सीमा पूर्वेकडे म्यानमारशी जोडलेली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Uttarakhand Tunnel Collapsed : 41 कामगार 8 दिवसांपासून बोगद्यात अडकून, कधी बाहेर येणार? गडकरी म्हणाले…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -