घरदेश-विदेशUGC NET Result : यूजीसी नेटचा निकाल जाहीर; 6,39,069 उमेदवारांनी दिली होती...

UGC NET Result : यूजीसी नेटचा निकाल जाहीर; 6,39,069 उमेदवारांनी दिली होती परीक्षा

Subscribe

UGC NET Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency – NTA) घेण्यात आलेल्लया यूजीसी नेटचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवारांना हा निकाल ntaresults.nic.in आणि ugcnet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. (UGC NET Result UGC NET result announced 639069 candidates appeared for the exam)

देशातील विद्यापीठे तसेच महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकपदी रूजू हाेण्यासाठी तसेच कनिष्ठ संशाेधन शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 6 जुलै  रोजी यूजीसी नेट 2023 तात्पुरती उच्चर सूची प्रसिद्ध केली होती. यानंतर उमेदरावांना 8 जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. विषय तज्ज्ञांकडून उमेदवारांच्या पुनरावलोकन केल्यानंतर आज (25 जुलै) यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – Anju Nasrullah Wedding : अंजूने इस्लाम धर्म स्वीकारून प्रियकराशी निकाहही केला; पाक मीडियाचा दावा

यूजीसी नेट परीक्षा दिलेल्या उमेदवारांना ntaresults.nic.in आणि ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर आपला निकाल पाहता येईल. उमेदवारांनी वेबसाईटवर गेल्यावर युजीसी नेट जून 2023 वर क्लिक करावे. त्यानंतर प्रवेश अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पीन टाकून लाॅगिन केल्यानंतर त्यांना निकाल दिसेल.

- Advertisement -

हेही वाचा – IRCTCची वेबसाइट 12 तासांपासून बंद; रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू

दरम्यान, यूजीसी नेट जून परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली होती. पहिला टप्पा 13 ते 17 जून आणि दुसरा टप्पा 19 ते 22 जून 2023 असा होता. देशभरातील 181 शहरांमध्ये 83 विषयांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला 6,39,069 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते, मात्र निकाल जाहीर झाल्यावर यातील 37,242 विद्यार्थी पात्र झाले आहेत.

हेही वाचा – SIMI Ban विरोधातील याचिकांवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; काय आहे कारण?

वर्षातून दोन वेळा होते यूजीसी नेट परीक्षा

युजीसी नेट परीक्षेतील दाेन्ही पेपरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवाराला सहाय्यक प्राध्यापक पद किंवा महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती (जेआरएफ) मिळू शकते. एनटीएच्या माध्यमातून वर्षातून दाेन वेळा जून आणि डिसेंबरमध्ये युजीसी नेट परीक्षेचे आयाेजन करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -