नवी दिल्ली : आधार कार्ड अपडेट करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. यामुळे आधार कार्डधारकांसाठी मोठा दिलासा आहे. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सलग दोन वेळा मुदतवाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी आधार कार्ड 14 जूनपर्यंत मोफत अपडेट करण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. यात आता वाढ करत 14 सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांसाठी वाढवली होती. यानंतर 15 डिसेंबरपर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड विनामूल्य अपडेट करू शकता.
हेही वाचा – आधार कार्ड हरवल्यानंतर घरबसल्या अशा पद्धतीने करा अर्ज
देशभरात कोणत्याही बँकेत खाते उघडायचे असा वा, सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी असो आणि आता प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची गरज सर्वांना लागते. यामुळे यूआयडीएआयने डिसेंबरपर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत आधार कार्ड अपडेट करू शकता.
हेही वाचा – आधार कार्ड अपडेट केलंत? लवकर करा, नाहीतर ‘या’ सुविधेला मुकाल
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 25 रुपये ऑनलाई आणि 50 रुपये ऑफलाईन शुल्क भरावे लागेत होते. माय आधार पोर्टल द्वारे तुम्ही आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तुम्हीला 25 रुपये फी भरावी लागणार होती. पण 15 मार्च पासून ऑनलाईन आधार अपडेची सुविना पूर्णपणे विनामूल्य करण्यात आली.