घरताज्या घडामोडीसंतापजनक! उपनिरीक्षक पोलिसांनी केला १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार

संतापजनक! उपनिरीक्षक पोलिसांनी केला १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार

Subscribe

एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मोलकरणीवर उपनिरीक्षक पोलिसांनी तब्बल ११ महिने वाईट कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी उपनिरीक्षक पंकज जैन याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मोलकरणीवर उपनिरीक्षक पोलिसांनी तब्बल ११ महिने वाईट कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी उपनिरीक्षक पंकज जैन याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

उज्जैन शहरामध्ये एक १७ वर्षीय तरुणी उपनिरीक्षक पंकज जैन यांच्या घरी घरकाम करत होती. याच संधीचा फायदा घेत पोलीस उपनिरीक्षकांनी तिच्यासोबत तब्बल ११ महिने वाईट कृत्य केल्याचा आरोप पीडितीनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींनी तिला घरी आणि हॉटेलमध्ये घेऊन तिच्याशी वाईट कृत्य केले. तसेच तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला धमकावत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

- Advertisement -

असे घेतले ताब्यात

पीडितीने सांगितल्याप्रमाणे, आरोपी उपनिरीक्षक पंकज जैन यांनी तरुणीला मंगळवारी हॉटेलमध्ये बोलवले होते. त्याप्रमाणे तरुणीने नीलगंगा पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि सापळा रचत पोलिसांनी आरोपी पंकज जैन याला ताब्यात घेत त्याला अटक केली आहे.


हेही वाचा – धक्कादायक: COVID Care Centre च्या कर्मचाऱ्यानेच केला महिलेचा विनयभंग!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -