घरक्राइमUjjain : उज्जैनमध्ये गुंडगिरी; दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील कुटुंबावर हल्ला, तीन जण जखमी

Ujjain : उज्जैनमध्ये गुंडगिरी; दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील कुटुंबावर हल्ला, तीन जण जखमी

Subscribe

देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक उज्जैन येथे कालभैरव मंदिराच्या (शंकर) दर्शनासाठी येत असतात. मनोभावे महाकालची पूजा करून भाविक भक्तीमय वातावरणात तल्लीन होतात. मात्र आलेल्या भाविकांनावर दुकानदारांनी गुंडागिरी करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उज्जैन येथे घडला.

उज्जैन : देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक उज्जैन येथे कालभैरव मंदिराच्या (शंकर) दर्शनासाठी येत असतात. मनोभावे महाकालची पूजा करून भाविक भक्तीमय वातावरणात तल्लीन होतात. मात्र आलेल्या भाविकांनावर दुकानदारांनी गुंडागिरी करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उज्जैन येथे घडला. विशेष म्हणजे मुंबईतील एका कुटुंबासोबत ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दुकानदाराला अटक केली आहे. (Ujjain Attack on family of Mumbai who came at kalbhairav mandir three injured)

प्रसाद खरेदी न केल्याने दुकानदार आणि त्याच्या साथीदाराने मिळून मुंबईतील एका कुंटुंबीयांना मारहाण केली. या कुटुंबातील एक व्यक्ती ही सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत. या वकिलाला लोखंडी रॉडचा वापर करून मारहाण करण्यात आली. तसेच, गाडीत बसलेल्या एका महिलेला तिचे केस पकडून तिला बाहेर खेचले असून मुलींची छेड काढल्याचे समजते. या मारहाणीत जखमी झालेल्या कुटुंबातील तीन जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे वकील अमरदीप भट्टाचार्य हे मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंबीयांनी रविवारी कालभैरव मंदिरात भस्म आरतीला हजेरी लावली होती. त्यानंतर येथील दुकानदार राजा भाटी यांनी वकील अमरदीप भट्टाचार्य यांना प्रसाद खरेदी करण्यास सांगितले. पण अमरदीप यांनी प्रसाद घेण्यास नकार दिला. त्यावेळी दुकानदार राजा भाटी याने वकिलांना तुम्ही गाडी इथेच लावली आहे, पुढे जायचं असेल तर प्रसाद खरेदी करावा लागेल, अशा शब्दांत धमकी देत त्यांच्यावर बळजबरी केली.

पण दुकानदाराच्या धमकीला न जुमानता अमरदीप आणि त्यांचे कुटुंबीय त्यांची गाडी घेऊव तेथून निघाले. तितक्यात दुकानदाराने प्रसाद जबरदस्तीने त्यांच्या गाडीत टाकला आणि प्रसादाचे 200 रुपये मागू लागला. त्यावेळी अमरदीप यांनी त्या दुकानदाराला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण दुकानदार ऐकायलाच तयार नव्हता. त्यावेळी दुकानदारासोबत भक्ताचा वाद झाल्याचे पाहून 60 ते 70 जणांनी अमरदीप यांच्या वाहनाला घेराव घातला. त्या गाडीचे चालक कमल कुमार यांना धमकावले. त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

या हाणामारीत अमरदीप यांच्या कुटुंबातील तीन जण जखमी झाले. पण तेथील जमाव त्या जखमींना रुग्णालयात जाऊ देत नव्हते. अखेर कमल कुमार यांनी त्या जमावातून मार्ग काढत तिघांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.


हेही वाचा – Crime News: माझ्या पतीला संपवणाऱ्याला 50 हजार देणार; पत्नीची थेट Online सुपारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -