कोचिंग क्लासला जाते सांगून प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेली आणि…

कोचिंग क्लासच्या निमित्ताने प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.

ujjain news girl murdered at ujjain hotel by slitting throat had left home for coaching
कोचिंग क्लासला जाते सांगून प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेली आणि...

कोचिंग क्लासला जाते सांगून प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. या तरुणीचे नाव तनु परिहार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीचा सध्या शोध सुरु आहे.

नेमके काय घडले?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील नाना खेडा परिसरात असलेल्या नटराज या हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. तनु परिहार ही तरुणी कोचिंग क्लासला जाण्याच्या निमित्ताने प्रियकर सुभाष पोरवालसोबत हॉटेलमध्ये गेली होती. या हॉटेलमध्ये त्यांनी संध्याकाळपर्यंत एक खोली बुक केली होती.

दरम्यान, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुभाष बाजारातून सामान आणण्यासाठी जातो, असे सांगून हॉटेलमधून बाहेर पडला. खूप वेळ होऊन देखील तो परतला नाही, तेव्हा हॉटेल मॅनेजरला शंका आली. त्यामुळे त्यांनी त्यांनी बुक केलेल्या खोलीचे दाक वाजवले. परंतु, आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांने दरवाजा उघडला त्यावेळी खोलीत तरुणीचा मृतदेह गादीवर पडलेला दिसून आला.

गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली होती. तसेच तिचा संपूर्ण खोली रक्ताने माखली होती. त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये धाव घेत मृतदेह ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


हेही वाचा – ‘BSF’च्या जवानांना सापडले दुर्मिळ पक्षी; एका जोडीची किंमत १५ लाख