घरट्रेंडिंगकर्मचाऱ्यांना मिळणार वीजबील भरण्यासाठी १८ हजार रुपये, 'या' कंपनीचा निर्णय

कर्मचाऱ्यांना मिळणार वीजबील भरण्यासाठी १८ हजार रुपये, ‘या’ कंपनीचा निर्णय

Subscribe

कर्मचाऱ्यांप्रती प्रेमभावना असलेले बॉस फार कमी असतात. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेणं, त्यांच्या प्रगतीसाठी मदत करणं फार कमी बॉसना जमतं. मात्र, एका बॉसने वाढत्या वीजबिलावरून आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरचे बील भरण्यासाठी वाढीव १८००० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील फोरकॉम (4Com company) कंपनीच्या मालकाने हा निर्णय घेतला आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटेनच्या 4Com कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डरोन हट यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी वाढीव पगार देण्याचा निर्णय घेता आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एनर्जी सपोर्ट बोनस प्रोग्राम सुरू केला आहे. त्यांच्या कंपनीत ४३१ कर्मचारी काम करतात. एनर्जी सपोर्ट बोनस प्रोग्रास तत्काळ सुरू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याला २०० पाऊंड म्हणजेच १८ हजार ८६३ रुपये देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

घरगुती वापरातील वीज बिलांची किंमत वाढणार असल्याचं ब्रिटन सरकारने घोषित केलं होतं. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात ३ हजार ६१५ पाऊंडपर्यंत प्रत्येकाचं बिल येण्याची शक्यता आहे. कंपनीतील कर्मचारी आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदत करणे आम्हाला गरजेचं वाटतं, असं या कंपनीचे चीफ एक्जिक्युटिव्ह गॅरी स्कट यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -