Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश लस घेतल्यावर झाल्या रक्त्यात गुठळ्या, युकेत AstraZeneca लस वापरावर आली बंदी

लस घेतल्यावर झाल्या रक्त्यात गुठळ्या, युकेत AstraZeneca लस वापरावर आली बंदी

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढता असल्याने जगभरातील देशात कोरोना लसींची मोहीम वेगात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधून कोरोना लसीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली होती. एस्ट्राजेनेकाची (astrazeneca) लस घेतल्याने ३० लोकांपैकी ७ व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या निर्माण झाल्याने त्यांना आपला प्राण गमवावा लागला होता. दरम्यान, कोरोनाची लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या निर्माण होणाऱ्या घटनेत वाढ झाल्यानंतर आता UK, ब्रिटनमध्ये AstraZeneca या लस वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तर वयवर्ष ३० आणि त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तींना एस्ट्राजेनेकाची लस देणार नसल्याचे सांगितले जात आहे. देशातील औषध नियामक संस्था MHRA ने (Medicines and Health Products Regulatory Agency) असे सांगितले की, १८ ते २९ वयवर्ष असणाऱ्या व्यक्तींना कोरोना लसीचा दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे.

औषध नियामक संस्था MHRA ने केलेल्या तपासणीत असे आढळले की, मार्च महिन्यापर्यंत एस्ट्राजेनेकाची लस घेणाऱ्या ७९ व्यक्तींना रक्तात गुठळ्या झाल्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. ज्यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी तीन जणांचे वय हे ३० वर्षांपेक्षा कमी होते. या घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर युरोपच्या कित्येक देशात एस्ट्राजेनेकाच्या लसीवर अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात आहे.

- Advertisement -

संस्थेचे असे देखील म्हणने आहे की, संस्थेला क्लॉटिंग अर्थात रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही, मात्र त्याचा संबंध कोरोना लसीकरणाशी जोडला जात आहे. त्यामुळे याला आणखी पर्याय म्हणून दुसरी कोरोनाची लस वापरण्याची शिफारस करण्याची आवश्यकता भासत आहे. MHRA मते, एस्ट्राजेनेका या कोरोना लसीचे दुष्परिणाम देखील कमी असून ही लस प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना सारख्या महामारीचा धोका लक्षात घेता या लसीचे फायदे अधिक आहेत. ब्रिटनमध्ये आतापर्यंत दोन कोटी लोकांना एस्ट्राजेनेकाची लस देण्यात आली आहे. ज्यामध्ये साधारण ७९ लोकांनाच मेंदू, धमन्यांसह पेशींमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले. म्हणजेच, या घटनेत २.५० लाख लोकांमध्ये साधारण एखादा व्यक्ती या घटनेचा बळी पडताना दिसतोय, त्यामुळे हा प्रकार दुर्मिळ असल्याचेही सांगितले जात आहे.


- Advertisement -