घरताज्या घडामोडीCovid-19 Medicine: लस व्यतिरिक्त कोरोनाच्या लढाईत आणखीन एक हत्यार तयार; ब्रिटनमध्ये वापरण्यासाठी...

Covid-19 Medicine: लस व्यतिरिक्त कोरोनाच्या लढाईत आणखीन एक हत्यार तयार; ब्रिटनमध्ये वापरण्यासाठी दिली मंजूरी

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून अधिक काळ कोरोना लढाईत लस ही महत्त्वाची अस्त्र आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण वेगाने केले जात आहे. मात्र यादरम्यान लस व्यतिरिक्त कोरोनाच्या लढाईत आणखीन एक अस्त्र तयार झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी ‘मर्क’ची गोळी वापरण्यास मंजूरी मिळाली आहे. ब्रिटनने परिणामकारक असलेल्या जगातील पहिल्या अँटीव्हायरल गोळीला सशर्त उपयोगासाठी मंजूरी दिली आहे. ब्रिटन पहिला देश आहे, ज्याने या गोळीला उपचारासाठी योग्य ठरवले आहे. मात्र ही गोळी किती लवकरात उपलब्ध होईल हे अस्पष्ट आहे.

१८ ते त्यावरील वयोगटातील कोरोना संक्रमित लोकांना या गोळीचा वापर करण्यास मंजूरी दिली आहे. या औषधाचे नाव ‘मोल्नुपिराविर’ असे आहे.

- Advertisement -

कसे करेल काम?

कोरोनाची हलके लक्षणे असलेल्या व्यक्तींना ही गोळी दिवसातून दोन वेळा घ्यावी लागले. ही अँटीव्हायरल गोळी कोरोनाची लक्षणे कमी करते आणि लवकर निरोगी होण्यास मदत करते. रुग्णालयातील रुग्ण कमी करण्यासाठी तसेच गरीब देशांना कोरोना नियंत्रण मिळवण्यासाठी ही गोळी मदत करू शकते. ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल.

अमेरिका, युरोप आणि काही देशातील संबंधित नियामक या औषधाचा आढावा घेत आहेत. अमेरिकेचे फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने गेल्या महिन्यात म्हटले होते की, या गोळीची सुरक्षा आणि परिणाम शोधण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस एक पॅनल बैठक बोलावले. औषध निर्माता कंपनी ‘मर्क’ने हे औषध तयार केले आहे. मागच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना ‘मोल्नुपिराविर’ते ४८०,००० डोस मिळण्याची घोषणा केली. त्यामुळे या हिवाळ्यात हजारो लोकांना उपचारात आणखीन मदत होईल अशी आशा आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जावीद म्हणाले की, ‘आमच्या देशासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. कारण ब्रिटन जगातील पहिला देश आहे, ज्याने अशा अँटीव्हायरल गोळीला मंजूरी दिली आहे. ही गोळी घरातच कोरोना उपचारात घेतली जाऊ शकते.’

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -