घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: रशियाचे विमान ब्रिटनने घेतले ताब्यात; आता युद्धादरम्यान आणखीन तणाव वाढण्याची...

Russia-Ukraine War: रशियाचे विमान ब्रिटनने घेतले ताब्यात; आता युद्धादरम्यान आणखीन तणाव वाढण्याची शक्यता

Subscribe

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता रशिया आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये टर्कीमध्ये बैठक होणार आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान ब्रिटनने रशियाचे एक विमान ताब्यात घेतले आहे. यामुळे तणाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे. रशियन विमान ताब्यात घेतल्याची माहिती ब्रिटनच्या वाहतूक मंत्र्यांनी दिली आहे. ब्रिटनने यापूर्वीच घोषित केले होते की, जर रशियाची विमान आणि चार्टर्ड विमान त्यांच्या हवाई हद्दीत घुसतात, तर याला क्राईम असल्याचे म्हटले जाईल आणि विमान जप्त केले जाईल.

दरम्यान रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन विमानांना युक्रेनमध्ये बॅन करण्यात आले होते. परंतु श्रीमंत रशियन नागरिकांनी दुसऱ्या देशांमध्ये आपले चार्टर्ड विमान रजिस्टर केले होते, जे ब्रिटनमध्ये पोहोचले होते. अशा विमानांना देखील ब्रिटनने उड्डाण करण्यावर रोख लावली होती. म्हटले होते की, अशा परिस्थितीत रशियन विमानांना जप्त केले जाईल. आता असेच ब्रिटनने केले आहे.

- Advertisement -

बीबीसीच्या वृत्तानुसार, , Hampshire स्थित Farnborough विमानतळावर आधीपासून एका विमानाची तपासणी सुरू होती. ज्या खासगी विमानाची तपासणी केली जात होती, त्याचे रजिस्ट्रेशन Luxembourg केले होते, याचा मालक हा रशियन नागरिक होता. तो रशियन नागरिकांना घेऊन ब्रिटनमध्ये पोहोचला होता. दरम्यान ब्रिटनने रशियावर यापूर्वीपासूनच अनेक निर्बंध लावले आहेत.

रशिया आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता टर्कीमध्ये बैठक होणार आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. यादरम्यान युक्रेनच्या सैन्यांनी दावा केला आहे की, रशियाचे 12 हजारांहून अधिक सैनिक मारले गेले आहेत. तर 317 टँक, 1070 लढाऊ वाहन, 120 तोफा, 49 एअरक्राफ्ट, 81 हेलिकॉप्टर, 60 फ्लू टँक 24 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत नष्ट केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Russia-Ukraine Crisis: जगातील सर्वात मोठ्या CERN वैज्ञानिक संस्थेतून रशियाला दाखवला बाहेरचा रस्ता


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -