घरताज्या घडामोडीCORONA VIRUS: ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना करोनाची लागण

CORONA VIRUS: ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना करोनाची लागण

Subscribe

नदीन डॉरिस ज्या लोकांना भेटल्या त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

जगभरात करोनाने विषाणुने थैमान घातले आहे. करोनाने जागतिक स्तरावर ४००० हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि ११३,०००हून अधिक संसर्गित झाले आहेत. करोनाने आता ब्रिटनमध्ये शिरकाव केला आहे. ब्रिटनच्या आरेग्यमंत्री नदीन डॉरिस यांनाही करोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: नदीन यांनी मंगळवारी दिली.

“मला करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझी वैद्यकीय केली असता करोना पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मी स्वत:ला घरामध्ये वेगळे ठेवले आहे.” दरम्यान, आरोग्य विभागाचे अधिकारी सध्या नदीन डॉरीस यांना करोनाची कुठे आणि कशी लागण झाली याची माहिती घेम्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – CORONA VIRUS: प्रवास इतिहास लपवणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

ब्रिटनच्या आरेग्यमंत्री नदीन डॉरिस यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना भेटल्या होत्या. दरम्यान, नदीन यांनी गेल्या काही दिवसांत ज्यांची भेट घेतली त्यांना करोनाची लागण झाल्याची भीती आहे. नदीन डॉरिस ज्या लोकांना भेटल्या त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -