ब्रिटनमध्ये मंक्रीपॉक्सची आढळली नवीन लक्षणे; रिसर्चमधून झाला आणखी धक्कादायक खुलासा

मंकीपॉक्स व्हायरसने आता जगातील अनेक देशांतील आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. एका रिसर्चनुसार, मंकीपॉक्स व्हायरसची नवीन लक्षण आता समोर येत आहेत जी जुन्या लक्षणांपेक्षा खूपचं वेगळी आहेत. ब्रिटनमधील मंकीपॉक्सबाधित रुग्णांचा तपास करणाऱ्या संशोधकांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत मंकीपॉक्स व्हायरस पश्चिम आणि मध्ये आफ्रिकेपर्यंत मर्यादित होता, परंतु आता जगभरातील अनेक देशांमध्ये या व्हायरसचा वेगाने प्रसार होत आहे. मेपासून जगभरात मंकीपॉक्सचे 3400 हून अधिक रुग्ण आढळून आले. यापैकी बहुतांश रुग्ण पश्चिम युरोपातील होते जे पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवतात. मात्र आफ्रिकेत आढळलेल्या रुग्णांशी याचा काही संबंध नाही, ब्रिटनमध्ये काही नवीन रुग्ण आढळून आले आहेत, ज्यांच्यावरील पहिला रिसर्च शुक्रवारी द लॅन्सेट इंफेक्शियस डिजीज जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

या रिसर्चनुसार, लंडनमधील संशोधकांची 54 मंकीपॉक्स रुग्णांचे विश्लेषण केले. दोन संक्रमित रुग्ण वगळता, बाकी सर्वांना याची माहितीच नव्हती की, ते अशा व्यक्तीच्या संपर्कात आले होते ज्याला मंकीपॉक्सची लागण झाली होती. यातील एक चतुर्थांश पुरुष HIV पॉझिटिव्ह होते तर एका चतुर्थांश लैंगिक संक्रमित रोगाने आणि मंकीपॉक्सने संक्रमित होते. या सर्व रुग्णांना त्वचेचा आजार होता. यापैकी 94 टक्के लोकांना जननेंद्रियांवर आणि गुदद्वाराच्या भागात हा आजार होता.

या रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की, मंकीपॉक्स व्हायरस त्वचा- त्वचेच्या संपर्कात आल्याने प्रसारित होत आहे. तसेच लैंगिक संबंधादरम्यान याचा संसर्ग होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मंकीपॉक्स पॉझिटिव्ह प्रकरणांची तपासणी करत आहे, परंतु हा व्हायरस लैंगिकरित्या प्रसारित होत नाही मात्र अगदी जवळच्या संपर्कातून पसरतो आहे.

ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सच्या केवळ 57 टक्के रुग्णांना ताप होता. मात्र पूर्वीच्या उद्रेकदरम्यान या व्हायरसच्या संक्रमणानंतर हातपाय, चेहरा आणि मानेवर अधिक जखमा दिसून आल्या होत्या. यात ब्रिटनच्या तीन चतुर्थांश प्रकरणांमध्ये जखम फक्त एक किंवा दोन भागात होत्या. (बहुधा गुप्तांगांवर किंवा आसपास). ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियामधील संसर्गजन्य रोगांचे तज्ञ पॉल हंटर जे या अभ्यासात सहभागी नव्हते, ते म्हणाले की, ब्रिटनने मंकीपॉक्सची व्याख्या बदलण्याची गरज नाही, कारण ती सध्या खूप विस्तृत झाली आहे.

यात डब्ल्यूएचओच्या युरोप प्रमुखांनी शुक्रवारी इशारा दिली की, गेल्या दोन आठवड्यांत या प्रदेशात मंकीपॉक्स व्हायरसच्या रुग्णांत तिप्पट झाली आहेत. त्याच वेळी, हा दुर्मिळ रोग खंडात मूळ धरू नये याची खबरदारी म्हणून त्यांनी युरोपियन देशांना अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. युनायटेड नेशन्सच्या आरोग्य एजन्सीने गेल्या आठवड्यात निर्णय घेतला की, रोग वाढत असतानाही या रोगाला जागतिक आरोग्य आपत्ती घोषित करण्याची आवश्यकता नाही.


उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना दिलासा, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला