घरताज्या घडामोडीब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन बनले बाबा, होणाऱ्या पत्नीने दिला बाळाला जन्म

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन बनले बाबा, होणाऱ्या पत्नीने दिला बाळाला जन्म

Subscribe

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेले बोरिस जॉन्सन प्रसूतीच्या वेळी रुग्णालयात उपस्थित होते.

कोरोनामधून वरे झालेले ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन वडील झाले आहेत. लंडनमधील रुग्णालयात होणाऱ्या पत्नीने कॅरी सायमंड्सने मुलाला जन्म दिला आहे. पंतप्रधान व प्रवक्त्यांनीही माहिती दिली की आई व मुलगा दोघेही निरोगी आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेले बोरिस जॉन्सन प्रसूतीच्या वेळी रुग्णालयात उपस्थित होते. तथापि, ते आता डाऊनिंग स्ट्रीटवर परत आले आहेत आणि कोरोना साथीचे आव्हान हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्षाच्या अखेरीस बोरिस काही दिवसांच्या पितृत्वाच्या रजेवर जाऊ शकतात.

कॅरी सायमंड्सचे हे पहिलं मुल आहे. परंतु बोरिस जॉनसन यापूर्वीही वडील बनले आहेत. कॅरी सायमंड्सच्या मुलानंतर ब्रिटिश पंतप्रधान आता सहा मुलांचे पिता झाले आहेत, परंतु अद्याप याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. अहवालानुसार, प्रेमाच्या बाबतीत बोरिस यांचे आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे आणि त्यांनी दोनदा लग्न केली आहेत. मात्र, बोरिस यांच्या अफेअरच्या बातमीनंतर हे दोन्ही विवाह तुटले. यूके दैनिक वृत्तपत्राच्या अहवालानुसार पंतप्रधानांना किती मुले आहेत? याची सार्वजनिक नोंद नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Breaking: रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन कोरोना पॉझिटिव्ह


डेली मेलच्या अहवालानुसार जॉन्सन आणि त्यांची दुसरी पत्नी मरिना व्हीलर २०१८ मध्ये विभक्त झाले. त्यांची चार मुले आहेत – लारा लेटिस (२६), मिलो आर्थर (२४), कॅसिया पेच (२२), आणि थियोडोर अपोलो (२०) ही चार मुलं आहेत. या व्यतिरिक्त असं म्हणतात की बोरिस जॉनसन यांना पाचवं मूल देखील आहे ज्याचं नाव स्टेफनी मॅकिन्ट्रे आहे. स्टेफनीची आई बोरिस जॉनसनची सल्लागार होती.

- Advertisement -

ऑक्सफोर्डमध्ये शिकत असताना जॉन्सनची पहिली पत्नी एलेग्रा मोस्टिन-ओवेन भेटली आणि दोघांनी १९८७ मध्ये लग्न केलं आणि १९९३ मध्ये घटस्फोट झाला. २००४ मध्ये जॉनसन आणि पत्रकार पेट्रोनेला व्याट आणि २००६ मध्ये एना फेजकेरल यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -